मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राष्ट्रवादीची 11 उमेदवारांची यादी तयार, यांना मिळणार तिकीट!

राष्ट्रवादीची 11 उमेदवारांची यादी तयार, यांना मिळणार तिकीट!


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी मुंबई, 30 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत असलेल्या 11 मतदारसंघात कोण उमेदवार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. यात विद्यमान 5 खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही तिकीट देण्यात येणार आहे. तर माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील यांचं नाव निश्चित झालं आहे. तर नाशिकमधून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. समीर भुजबळ अलीकडेच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 2 वर्ष तुरुंगात होते. ते जामिनावर बाहेर आले आहे. हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीने मित्रपक्षाला जागा सोडली आहे. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक लढवणार आहे. पहिल्या यादीतील उमेदवार असे 1) बारामती - सुप्रिया सुळे 2) कोल्हापूर - धनंजय महाडिक 3) सातारा - उदयनराजे भोसले 4) माढा-विजयसिंह मोहिते-पाटील 5) रायगड - सुनील तटकरे 6) बुलढाणा - राजेंद्र सिंगणे  7) नाशिक - समीर भुजबळ 8) ठाणे - संजीव नाईक  9) उस्मानाबाद - अर्चना पाटील / राणा जगजित  10) ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील 11) हातकणंगले - राजू शेट्टी  12) गोंदिया - वर्षा पटेल / मधुकर कुकडे अजित पवारांचा मुलगा लोकसभा लढवणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मावळ लोकसभा मतदसंघातून पार्थ यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मावळमध्ये पार्थ यांच्या उमेदवारीवरून अजित पवार यांचा हट्ट अखेर शरद पवार पूर्ण करणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या उमेदवारीस अनुकूल भूमिका राष्ट्रवादीच्या हायकमांड घेण्याची तयारी असल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे, पार्थ पवार हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. पार्थ पवार हे मागील निवडणुकीतच सक्रीय सहभागीही झाले होते. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार मैदानात उतरणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. ==========================
First published:

Tags: Election, Lok sabha, NCP, Sharad pawar, Supriya sule, अजित पवार, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी, शरद पवार, सुप्रिया सुळे

पुढील बातम्या