नवी दिल्ली, ता.12 जुलै : लोकसभेच्या निवडणूकीला वर्षभराचा अवधी असला तरी सर्वच पक्षांनी तयारीला जोरदार सुरवात केली आहे. भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची रणणीती आखत आहेत. तर कर्नाटकमुळं बळ मिळाल्यानं काँग्रेसमध्येही थोडं उत्साहाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने 2019 साठी मास्टप्लान तयार केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशातून त्याची सुरूवात करणार आहेत. 2014 च्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या झंझावती दौऱ्यांनी देश पिंजून काढला होता. आताही नरेंद्र मोदी हेच भाजपचे गेम चेंजर राहणार असून पंतप्रधानांच्या दौऱ्याची आखणी भाजपने पूर्ण केली आहे. मागच्या महिन्यात पंतप्रधानांनी पाच राज्यांमधल्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर महत्वाचा निर्णय घेत 24 खरिप पीकांच्या हमीभावात दिडपट वाढही केली होती. शेतकरी नाराज असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला होता.
'भाईं’चा इलाका पाण्यात बुडाला,मदतीला कुणी नाही आलं !
VIDEO : अकोला महापालिकेत स्मशानभूमीवरून राडा!
देशातल्या चार भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी चार जाहीर सभा करणार आहेत. त्याची सुरवात बुधवारी 11 जुलैरोजी पंजाबमधल्या मुक्तसर इथून झाली. 21 जुलैला उत्तरप्रदेशात नंतर कर्नाटक आणि ओडिशातही पंतप्रधान जाहीर सभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणूकींची घोषणा व्हायच्या आधी पंतप्रधानांच्या देशात 50 सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचीही भाजपची योजना आहे.
तर भाजपाध्यक्ष अमित शहा प्रत्येक राज्यांमध्ये जावून बुथस्तरावरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. 2019 ची खरी निवडणूक ही सोशल मीडियावर लढली जाणार असल्याने सोशल मीडिया सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची खास फौजच भाजपने तयार केली असून त्यांनाही अमित शहा खास टिप्स देत आहेत. या तयारीसाठी भाजपने दिल्लीतल्या नव्या कार्यालयात हाय टेक वॉर रूम तयार केली असून देशातल्या प्रत्येक राज्यातल्या घडामोडींची बारीक सारिक माहिती गोळा केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा