'...तर तुम्हाला शाप लागेल', त्याने निवडणूक अधिकाऱ्यांना लिहले पत्र

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 04:18 PM IST

'...तर तुम्हाला शाप लागेल', त्याने निवडणूक अधिकाऱ्यांना लिहले पत्र

राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीमधून वाचण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सरकारी कर्मचाऱ्यांकडून लढवल्या जात आहेत. एका कर्मचाऱ्याने असेच एक अॅप्लिकेशन दिले आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांना म्हटले की, सुट्टी दिली नाहीत तर शाप लागेल.

शाप लागण्याच्या या चिठ्ठीनंतर जयपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक कठोर निर्णय घेतला आणि इतर कर्मचाऱ्यांना इशारा दिला.

निवडणुकीची ड्यूटी लावण्यात आल्यानंतर शाप देणारी चिठ्ठी एका कर्मचाऱ्याने लिहली. जयपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रमेशचंद शर्मा यांची एका ठिकाणी ड्युटी लावली होती.

Loading...

ड्युटी हटवण्यासाठी कर्मचाऱ्याने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहले. यात म्हटले की, मी पक्षांची सेवा करतो. जर निवडणुकीचे काम लावलेत तर पक्षी मरतील आणि तुम्हाला शाप लागेल.

जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याच्या अशा पत्रानंतर त्याला थेट कार्यमुक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले की, निवडणूक हे एक महत्त्वाचे काम आहे आणि कर्मचाऱ्याने पक्ष्यांची सेवा करायची असल्याचे कारण दिले होते. त्यामुळे त्याला सेवामुक्त करण्यात आले.

जयपुर जिल्ह्यात तब्बल 4 हजार 500 लोकांनी निवडणुकीची ड्युटी रद्द करण्यासाठी पत्र लिहलं आहे. जिल्ह्यात एकूण 40 हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...