योगी आदित्यनाथांसह उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचं कुंभमेळ्यात 'शाही स्नान'!

कुंभमेळ्याचं निमित्त करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी प्रयागराज इथं घेतली. अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करत त्यांनी गंगेत स्नानही केलं.

  • Share this:

उत्तर प्रदेशच्या इतिहासात मंगळवार 29 जानेवारीचा दिवस खास होता. कारण पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक राजधानी लखनऊच्या बाहेर होत होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अख्ख मंत्रिमंडळ मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रयागराज इथं दाखल झालं होतं. कुंभमेळ्याचं निमित्त साधत योगींनी प्रयागराजला मंत्रिमंडळाची बैठक घेत स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.

या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मीरत ते प्रयागराज असा सहापदरी गंगा एक्सप्रेस वे बनविण्याची घोषणा त्यांनी केली. या महामार्गावर 36 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

यानंतर योगी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शाही स्नानासाठी त्रिवेणी संगमावर दाखल झाले. योगींनी इतर साधू संतांसह गंगेत स्नान केलं.

'भव्य कुंभ, दिव्य कुंभ' हे यावर्षीच्या कुंभमेळ्याचं घोषवाक्य सरकारने ठरवलं होतं. त्यानुसार सरकारने जोरदार तयारी केली होती. 71 देशांचे राजदूत आणि 3 हजार अप्रवासी भारतीयांनीही या मेळ्यात स्नान केलं अशी माहिती आदित्यनाथ यांनी दिली.

लोकसभा निवडणुका जवळच असल्याने सरकारकडून त्याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. राम मंदिराविषयीची साधू संतांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी या बैठकीचा योगींनी उपयोग केल्याचं बोललं जातंय.

काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी याही 5 फेब्रुवारीला कुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. त्यामुळे योगींच्या आजच्या स्नानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

प्रियांकांच्या आगमनामुळे काँग्रेस ब्राम्हण मतदारांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रयागराजला मंत्रिमंडळाची बैठक घेणं महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 07:52 PM IST

ताज्या बातम्या