'शरद पवारांना पंतप्रधानपदाचा लायक मानत नाही'

'शरद पवारांना पंतप्रधानपदाचा लायक मानत नाही'

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे: लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर अनेक राजकीय नेते अंदाज व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या उमेदवार असल्याचे म्हटले होते. पवारांचे या वक्तव्यावर संपूर्ण देशात चर्चा सुरु झाली होती. निवडणुकीनंतर पवार देखील पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतील असे बोलले जाते. यावर आता डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

वाचा- मोदी आणि शहांविरुद्धच्या तक्रारी या तारखेपूर्वी निकाली काढा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. इतक नव्हे तर ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे विधान आंबेडकरांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

ना मोदी, ना राहुल गांधी होणार पंतप्रधान

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपच्या 50 जागा कमी होणार

यंदाच्या निकालात भाजपला 148 ते 200 जागा मिळतील असा अंदाज आंबेडकरांनी व्यक्त केला. तर काँग्रेसला 100पर्यंत जागा मिळतील असे आंबेडकर म्हणाले.

काय म्हणाले होते पवार

एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात, असे सांगितले होते. यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असे म्हटले होते. मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केले होते. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

हे देखील वाचा- निवडणुकीच्या काळात राज्यात मुद्देमालच नव्हे तर 8 कोटी रुपयांचे ड्रग्सही जप्त!

पवारांसाठी ही शेवटची संधी?

शरद पवार यांचं लक्ष दिल्लीच्या तख्ताकडे आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुका ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असल्याचं मानलं जातंय. राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांच्या खास मर्जीतले कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार पंतप्रधान होतील, असं म्हटलं होतं. पवार स्वतः मात्र याबाबत उघडपणे काही बोललेले नाहीत. उलट त्यांनी पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलंय.

VIDEO : नवरदेवाने घेतला उखाणा, पण उदयनराजेंच्या अ‍ॅक्शनने नवरीच लाजली...

First published: May 2, 2019, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading