मोदी मागत आहेत बॉलिवूडकरांकडे मदत, पाहा नेमकं काय केलं...

मोदी मागत आहेत बॉलिवूडकरांकडे मदत, पाहा नेमकं काय केलं...

निवडणुकांच्या तारखा कळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकार, गायक, इतर राजकीय नेते, खेळाडू आणि मीडियांना सोशल मीडियावर एक अपील करत आहेत.

  • Share this:

मुंबई, १३ मार्च २०१९- या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तारखा कळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकार, गायक, इतर राजकीय नेते, खेळाडू आणि मीडियांना सोशल मीडियावर एक अपील करत आहेत. आपल्या ट्वीटमधून पंतप्रधानांनी दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शंकर महादेवन, विकी कौशल, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि आमिर खान यांसारख्या कलाकांराना जनतेला मतदानाचं महत्त्व समजवण्याचा आग्रह केला आहे.

मोदी यांचे ट्वीट फार रंजक आणि मजेशीर आहेत. मोदी यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले की, ‘माझे मित्र रणवीर सिंग, वरुण धवन आणि विकी कौशल. अनेक तरुण तुमचं कौतुक करतात. त्यांना आता हे सांगण्याची वेळ आली आहे की, अपना टाइम आ गया है... आणि ही वेळ आहे तुमच्या वोटिंग सेंटरवर हाय जोश दाखवण्याचा.’

दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि ए.आर. रेहमान यांनाही मोदींनी अपील केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, मी तुम्हाला विनंती करतो की, २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत अधिकाधिक लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा. लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी एक मतही फार उपयोगी आहे. मोदींनी लिहिले की, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा तुम्हीही आगामी लोकसभा निवडणूकीत लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करा.

प्रिय अक्षय कुमार भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुराना एका मताची शक्ती अफाट आहे आणि आपणा सर्वांना याबद्दलची जागरुकता निर्माण केली पाहिजे. थोडा जोर लावा आणि मतदानाला सुपरहिट कथा करा.

अक्षय कुमारने या ट्वीटला उत्तर देताना म्हटले की, ‘पंतप्रधान मोदी योग्य बोलले. लोकशाहीची खरी ओळख मतदानात सक्रीय भाग घेणं हेच आहे. आपला देश आणि जनतेमध्ये सुपरहिट प्रेमकथा झाली पाहिजे.’ तर ए.आर. रेहमानने आम्ही नक्कीच लोकांना प्रोत्साहित करू असं उत्तर मोदींच्या ट्वीटला दिलं.

First published: March 13, 2019, 5:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading