• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • #BattleOf2019 : महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार मतदान

#BattleOf2019 : महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार मतदान

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेलं महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 10 मार्च  : लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकांची अखेर घोषणा झाली.  देशात सात  या टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेलं  महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. तर, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात  असं होणार मतदान 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली असून त्यांनी काही मित्रपक्षांना सोबत घेतलं आहे. स्वाभीमानीच्या राजू शेट्टी यांनी आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. मात्र जागावाटपावरून बिनसल्याने राजू शेट्टी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. मात्र जागा वाटपावरून मतभेद झाल्याने ती चर्चा पुढे जाऊ शकली नाही. नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 19 फेब्रुवारीला सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असल्याचं दोनही नेत्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातली 2014 ची स्थिती लोकसभेच्या एकूण जागा - 48 भाजप - 22 शिवसेना - 18 राष्ट्रवादी - 05 काँग्रेस - 02 इतर - 01 हे आहेत महाराष्ट्रातले 48 मतदार संघ अकोला, अमरावती, अहमदनगर,उस्मानाबाद,औरंगाबाद,कल्याण,कोल्हापूर,गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर,जळगाव, जालना, ठाणे, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बारामती, बीड, बुलढाणा, भंडारा गोंदिया, भिवंडी, माढा, मावळ, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, यवतमाळ-वाशिम, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेक, रायगड, रावेर, लातूर, वर्धा, शिरुर, शिर्डी, सांगली, सातारा, सोलापूर, हातकणंगले, हिंगोली, महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या निवडणुकीत  भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. तर विधानसभेत मित्रपक्षांशी चर्चा झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार आहेत. युतीत काही अडचणी आल्यास उद्धव ठाकरे आणि अमित शहा त्यावर मार्ग काढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. विधानसभेत सरकार आल्यास सर्व मंत्रिमंडळात भाजप आणि शिवसेनला सारख्याच जागा मिळतील असंही त्यांचं ठरलं आहे.
First published: