आता काही तरी नवं करणार Akshay Kumar, निवडणूक लढवण्याच्या बातमीला असं दिलं उत्तर

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी आपल्या अधइकृत ट्विटर अकाउंटवरुन राजकारणातील त्याच्या प्रवेशाबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 03:36 PM IST

आता काही तरी नवं करणार Akshay Kumar, निवडणूक लढवण्याच्या बातमीला असं दिलं उत्तर

मुंबई, २२ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी आपल्या अधइकृत ट्विटर अकाउंटवरुन राजकारणातील त्याच्या प्रवेशाबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. त्याने जे ट्वीट केलं ते पाहता असं म्हटलं जात आहे की, तो लोकसभा निवडणुकीत उतरण्यास सज्ज झाला आहे. मात्र त्याने दुसरं ट्वीट करून तो राजकारणात येत नसल्याचं स्पष्ट केलं.अक्षयने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, एका नवीन क्षेत्रात पाय ठेवतो आहे. मी काही असं करणार आहे जे आतापर्यंत कधीच केलं नाही. माझ्या या निर्णयाबद्दल मी उत्साहीही आहे आणि थोडं दडपणही आहे. पुढील अपडेटवर तुम्ही नजर ठेवून रहा. अक्षयच्या या ट्वीटनंतर बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला होता.


Loading...


मात्र खिलाडी कुमारने अजून एक ट्वीट करत राजकीय क्षेत्रात तो येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने लिहिले की, ‘माझ्या पहिल्या ट्वीटची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद, पण अफवांना पूर्ण विराम द्या. मी हे स्पष्ट करतो की मी निवडणूक लढवत नाहीये.’ अक्षयच्या पहिल्या ट्वीटवरुन तो निवडणुकांच्या रिंगणात उतरेल असे वाटत होते. मात्र तो निवडणूक लढवणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...