Home /News /news /

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शबाना आझमी देश सोडणार? काय आहे सत्य?

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शबाना आझमी देश सोडणार? काय आहे सत्य?

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शबाना आझमी देश सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर आता त्यांनी पुढे येत सत्य परिस्थिती सांगितली आहे.

    मुंबई, 12 मे : राजकारणावर आपली बेधडक मतं मांडायला शबाना आझमी ओळखल्या जातात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. शिवाय, बेगुसराय येथे कन्हैया कुमारच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यावर देखील चर्चा रंगल्या. दरम्यान, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मी देश सोडेन असं विधान शबाना आझमी यांनी केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर आता शबाना आझमी यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे. काय म्हणाल्या शबाना आझमी? नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शबाना आझमी देश सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यानंतर आता शबाना आझमी यांनी खुलासा केला आहे. मी देश सोडणार असलेल्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. मी असं काहीही बोलले नाही. देश सोडण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. मी भारतात जन्मले आणि भारतातच मरेन. या गोष्टीचा निषेध करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नसल्याचं शबाना आझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सट्टा बाजारात कुणाची हवा? बहुमत न मिळाल्यास कोण करणार मोदींना मदत? नरेंद्र मोदींवर टीकास्त्र देश सोडण्याची बातमी खोटी असल्याचं सांगत शबाना आझमी यांनी नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. शिवाय, फेक न्युज ब्रिगेडची अवस्था सध्या खराब आहे. त्यांना खोटं पसरवण्यामध्ये धन्यता वाटत आहे.  मला विरोधकांशी शत्रुसारखं वागायचं नाही असं देखील शबाना आझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शबाना आझमी यांच्या ट्विटवर आता अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. VIDEO : राजकारणाच्या मैदानातील 'सामना', मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो...
    First published:

    Tags: Lok sabha election 2019, Narendra modi

    पुढील बातम्या