लोकसभा निवडणूक निकाल LIVE : या राज्यात चाललं नाही मोदींचं मॅजिक

केरळमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं. देशभरात भाजपची घोडदौड सुरू असतानाच पंजाब आणि केरळ ही राज्यं काँग्रेसने मिळवली. राहुल गांधींच्या वायनाडमधल्या उमेदवारीमुळेही केरळकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 01:13 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल LIVE : या राज्यात चाललं नाही मोदींचं मॅजिक

तिरुवनंतपुरम, 23 मे : केरळमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं. देशभरात भाजपची घोडदौड सुरू असतानाच पंजाब आणि केरळ ही राज्यं काँग्रेसने मिळवली. राहुल गांधींच्या वायनाडमधल्या उमेदवारीमुळेही केरळकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

LDF विरुद्ध UDF

केरळच्या राजकारणात दोन महत्त्वाच्या आघाड्या आहेत . त्यापैकी एक आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM)च्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF)आणि दुसरा म्हणजे काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट (UDF)होय. यातील LDFआघाडीत सीपीआय, जेडीएस, एनसीपी आणि अन्य छोटे पक्ष आहेत. तर UDFमध्ये काँग्रेससह इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), केरळ काँग्रेस-एम आणि अन्य छोटे पक्ष सहभागी आहेत.

मागच्या निवडणुकीत UDF चा विजय

2014च्या लोकसभा निवडणुकीत UDFने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 8 जागा काँग्रेसने तर दोन जागा IUMLने जिंकल्या होत्या. 2009च्या निवडणुकीत देखील राज्यातील 20 पैकी सर्वाधिक जागा UDFने जिंकल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला 40 टक्के मतं मिळाली होती आणि 13 जागांवर विजय मिळाला होता. 2004मध्ये LDFने 15 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता.

Loading...

यंदा LDF सर्व म्हणजेच 20च्या 20 जागांवर लढली. त्यापैकी CPM 16 तर CPI 4 जागांवर असं जागावाटप झालं. UDFमध्ये काँग्रेस 15, IUML 2 जागांवर तर केरळ काँग्रेस-एम, सोशलिस्ट जनता डेमोक्रेटिक पक्ष प्रत्येकी जागेवर लढला. भाजपने भारत धर्म जनसेना या पक्षासोबत युती केली होती. ते 14 जागांवर लढले.

राज्यात भाजप कार्यकर्ते आणि RSSचे संघटन याच आधारावर निवडणुकीचा प्रचार करण्यात आला होता पण भाजपला इथे समाधानकारक यश मिळालं नाही.

केरळमध्ये 20 जागा

केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा असून त्यापैकी 2 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. राज्यात याआधी मे 2016मध्ये विधानसभेच्या 141 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि त्यात काँग्रेसचा पराभव करत डाव्या पक्षांनी बाजी मारली होती. राज्यात एकूण 2 कोटी 54 लाख 58 हजार 095 मतदार आहेत. यात 1 कोटी 23 लाख 45 हजार 027 पुरुष तर 1 कोटी 31 लाख 12 हजार 949 महिला तर 119 अन्य मतदार आहेत. राज्यात यंदा 76.82% टक्के मतदान झालं. 2014च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली होती.

===========================================================================

VIDEO : महाराष्ट्रात भाजप-सेनेची युती जोमात, आघाडी कोमात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...