News18 Lokmat

येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आमनेसामने

लोकसभा निवडणुकांसाठी सुरू असलेल्या या प्रचाराच्या आखाड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2019 01:36 PM IST

येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आमनेसामने

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 02 एप्रिल : येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आमनेसामने असणार आहेत. शनिवारी संध्याकाळी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे भाषण करणार आहेत. त्यावेळी ते नरेंद्र मोदींवर घणाघात करणार असल्याचं सांगण्यात आहे तर त्याच दिवशी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांची नांदेड इथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी सुरू असलेल्या या प्रचाराच्या आखाड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. गेल्या काही भाषणांमधून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यामुळे येणाऱ्या सभेत ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

खरंतर, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोन्ही लोकप्रिय नेते आणि उत्तम वक्ते आहेत. त्यामुळे दोन्हीही सभांकडे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं लक्ष असणार आहे.

Mission Shakti 'प्रसिद्धी शास्त्रज्ञांना मिळू द्या', राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Loading...

राज ठाकरे यांनी 'मिशन शक्ती'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. ''एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

शिवाय, 'वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे, त्यांना सांगू द्या... त्यांना प्रसिद्धी मिळू द्या', असा टोलादेखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.  डीआरडीओ आणि इस्रोनं उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (27 मार्च) दिली. यावरूनच राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल चढवला आहे.


VIDEO: असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा; राहुल गांधींचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...