मतदानादरम्यान हिंसा, कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्याची गाडीच फोडली

मतदानादरम्यान हिंसा, कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्याची गाडीच फोडली

लोकसभा निवडणूक 2019 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. यासाठी 9 राज्यांमध्ये 72 जागांवर मतदान होत आहे.

  • Share this:

आसनसोल, 29 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. यासाठी 9 राज्यांमध्ये 72 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या 8 जागांचादेखील समावेश आहे. पण मतदानाच्या या दिवशी हिंसा घडल्याचा एक प्रकार समोर आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे.

या हाणामारीमध्ये भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या कारवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. या संपूर्ण प्रकारामुळे आजच्या मतदानाला कुठेतरी गालबोल लागलं अशा चर्चा आहेत.

हेही वाचा : SPECIAL REPORT: राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, झालेल्या दगडफेकीमध्ये बाबुल सुप्रियो यांना कोणतीही दुखापत झाली नाही. आसनसोल मतदार संघातून बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात टीएमसीमधून अभिनेत्री मुनमुन सेन मैदानात आहे. बाबुल सुप्रियो यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव घेत टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, 'निवडणुकांमध्ये गडबड करण्याच कट रचण्यात आला होता.'

तर, आसनसोलच्या जेमुआमध्ये एका मतदान केंद्रावर काही नागरिकांनी मतदान करण्यासाठी नकार दिला. कारण, मदतान केंद्रावर कोणतीही सुरक्षा ठेवण्यात आली नव्हती. तर काही मतदार केंद्रामध्ये टीएमसी आणि सुरक्षा दलामध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

दरम्यान, एका मतदान केंद्रामध्ये टीएमसीला मतदान करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. आसनसोलमध्ये झालेल्या हिंसेला घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी, विजय गोयल आणि अनिल बलूनीसह पक्षाचे अनेत महत्त्वाचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.


VIDEO: मुंबईतून मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या