विवेक ओबेरॉयने मीम शेअर करत उडवली ऐश्वर्या आणि एक्झिट पोलची थट्टा?

विवेक ओबेरॉयने मीम शेअर करत उडवली ऐश्वर्या आणि एक्झिट पोलची थट्टा?

एग्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची पुन्हा एकदा सत्ता येऊ शकते. या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे. यात विरोधी पक्षाची थट्टाही उडवण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मे- संपूर्ण देशाचं ज्या एका गोष्टीकडे लक्ष लागून राहिलं आहे ती म्हणजे २३ मे रोजी येणारे लोकसभा निवडणुकांचे निकाल. एग्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची पुन्हा एकदा सत्ता येऊ शकते. या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे. यात विरोधी पक्षाची थट्टाही उडवण्यात येत आहे. दरम्यान भाजप पक्षाचं खुलेपणानं समर्थन करणाऱ्या एका बॉलिवूड अभिनेत्याचं एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ट्वीटमध्ये विवेकने दुसऱ्या एका युझरचं मीम शेअर केलं. या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत आहेत. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एग्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली आहे.विवेकने शेअर केलेल्या मीममधील पहिल्या फोटोत सलमान आणि ऐश्वर्या दिसत आहे. या फोटोला कॅप्शन दिलं गेलंय की, ओपिनियन पोल. दुसऱ्या फोटोमध्ये विवेक आणि ऐश्वर्या दिसत आहेत. या फोटोवर लिहिलं गेलं की, एग्झिट पोल. तर तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत दिसत आहे. या फोटोला कॅप्शन लिहिलं गेलं की ‘रिझल्ट’.

या मीममार्फत विवेक एग्झिट पोलची थट्टा उडवताना स्पष्ट दिसत आहे. सलमान आणि विवेकसोबत ऐश्वर्याच्या नात्याबद्दल तर साऱ्यांनाच माहीत आहे. दोघांशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्यांना आराध्याही मुलगीही आहे. अशावेळी भुतकाळ उकरून जबरदस्ती विनोदनिर्मिती करणं एका अभिनेत्याला शोभत नाही अशा टीका त्याच्यावर होत आहेत. विवेकच्या या ट्वीटवर चांगल्या कमेंट कमी आणि त्याला खडे बोलच जास्त सुनावले गेले आहेत. एकीकडे विवेक भाजपला समर्थन देताना दिसतो तर दुसरीकडे तो एग्झिट पोलच्या निर्णयावरच हसताना दिसत आहे.एग्झिट पोलमध्ये तर भाजप दुसऱ्यांदा विजयी होणार असेच दाखवण्यात आले आहे. विवेकच्या या दुटप्पी भूमिके मागचं कारण काय असा प्रश्न आता त्याला विचारला जात आहे. लवकरच विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तो स्वतः मोदींची भूमिका साकारत आहे.

VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या