उद्धव ठाकरेंच्या विदर्भातील चारही सभा केवळ सेना उमेदवारांच्या प्रचारासाठी

उद्धव ठाकरेंच्या विदर्भातील चारही सभा केवळ सेना उमेदवारांच्या प्रचारासाठी

उद्धव ठाकरे विदर्भात केवळ शिवसेना नेत्यांचा प्रचार करणार का? असा सवाल विचारला जात आहे.

  • Share this:

नागपूर, प्रविण मुधोळकर, 05 एप्रिल : परस्परांवर टीका करत अखेर लोकसभा आणि विधानसभेकरता शिवसेना-भाजपनं युती केली. त्यानंतर डिनर डिप्लोमसी आणि कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ते, नेते आणि आमदारांशी संवाद देखील साधला. कोल्हापुरात अंबाबाईचा आशिर्वाद घेत युतीच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला. दोन्ही नेत्यांनी एकत्र सभांवर भर न देता राज्य पिंजून काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्याची व्यूहरचना देखील आखली. पण, विदर्भातील उद्धव ठाकरेंच्या सभा पाहता उद्धव ठाकरे केवळ शिवसेना उमेदवारांसाठी प्रचार करणार का? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे विदर्भात रामटेक, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या चार ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे केवळ सेनेच्या उमेदवारांचा प्रचार उद्धव ठाकरे करणार का? असा सवाल निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी सभा घ्यावी यासाठी भाजपचे उमेदवार आग्रही होते. दरम्यान, विदर्भातील उन्हामुळे उद्धव ठाकरे विदर्भात केवळ चार सभा घेणार का? असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे.

राजकीय जाणकार काय म्हणतात?

दरम्यान, यावर विचारले असता ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी 'शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. भांडणानंतर युती झाली. पण त्यांची मन जुळलेली नाहीत. भाजपनं देशपातळीवर प्रगती करत असताना राज्यात जर भाजप वाढली तर त्याचा परिणाम हा शिवसेनेच्या वाढीवर होईल. शिवाय, लोकसभेत भाजपला जास्त जागा मिळाल्यास विधानसभेकरता भाजपला जास्त जागा द्याव्या लागतील. त्यासाठी उद्धव ठाकरे हे भाजप उमेदवारांचा प्रचार करणं टाळत आहेत. शिवाय, आपल्या सभांमधून कार्यतकर्त्यांना देखील तसा संदेश देताना दिसत' असल्याची प्रतिक्रिया दिली.

हिंदुत्वाच्या मुद्यावर युती

दरम्यान, युती करताना दोन्ही पक्षांचा विचार एक आहे. देशाच्या, राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो. यापुढे मतभेद झाल्यास काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया शिवसेना - भाजप नेत्यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीकरता शिवसेना 23 तर भाजप 25 जागांवर लढणार आहे. तर, विधानसभेकरता मित्र पक्षांना जागा दिल्यानंतर उर्वरित जागांवर 50-50 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुका या सात टप्प्यांमध्ये होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली असून त्यांनी युतीसमोर देखील आव्हान उभं केलं आहे.

राज्यातील काँग्रेस शरद पवार चालवत आहेत - मुख्यमंत्री

First published: April 5, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading