सातारा, 2 एप्रिल : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या बोलण्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कॉलर उडविण्यावरून त्यांच्या स्टाईलची बरीच चर्चा होत असते. त्यावरून मंगळवारी ते चांगलेच संतापले. कॉलर उडविल्यामुळे काय होतं असं लोक विचारतात, काय होतं काय? होणारे बलात्कार थांबतात असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.