शिवसेना - भाजप खासदारांची संपत्ती 60 टक्क्यांनी वाढली

शिवसेना - भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 08:53 AM IST

शिवसेना - भाजप खासदारांची संपत्ती 60 टक्क्यांनी वाढली

मुंबई, 07 एप्रिल : भाजप खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 106 टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना - भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी 3.20 कोटींची वाढ झाली आहे. एडीआरच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 2014 आणि 2019मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.

सात मतदारसंघात महाराष्ट्र इलेक्शन वॉच अ‍ॅण्ड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्सनं 116 पैकी 115 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केलं. त्यानंतर ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी 33 टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत. त्यांची मालमत्ता सरासरी 2 कोटी 35 लाख रूपये आहे. 19 उमेदवारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 10 गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत.


पूनम महाजनांच्या संपत्तीमध्ये घट, आकडा पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!


Loading...

भाजप - शिवसेनेचे कोट्याधीश उमेदवार

एडीआरच्या अहवालामध्ये 115 पैकी 33 उमेदवार कोट्याधीश असल्याचं म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यातील 115 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 2.35 कोटी रूपये आहे. तर, भाजपच्या पाच उमेदवारांची सरासरी मालमत्ता 18.99 कोटी रूपये तर, शिवसेनेच्या दोन खासदारांची सरासरी मालमत्ता 9.62 कोटी रूपये आहे. यामध्ये 10 उमेदवारांनी आपले पॅन घोषित केलेले नाही. तर, 115 पैकी 11 उमेदवारांनी उत्पन्नाचे स्त्रोत घोषित केलेले नाहीत. दरम्यान, प्रतिज्ञापत्रामध्ये 48 उमेदवारांनी प्राप्तिकर विवरण घोषित केलेले नाही. या अहवालानुसार विद्यमान सहा खासदारांची 2014ची मालमत्ता 5.37 कोटी रूपये आहे. तर, 2019मधील त्यांची मालमत्ता ही 8.57 कोटी रूपये आहे. सारी आकडेवारी पाहिल्यानंतर शिवसेना - भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी 60 टक्के वाढ झाली आहे.

सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संपत्तीवरून जोरदार आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचवेळी ही आकडेवारी समोर आली आहे.


VIDEO : भाजपविरोधात सभांबद्दल राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 08:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...