मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये - शरद पवार

मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये - शरद पवार

पंतप्रधान ही एक ही संस्था आहे या पदावर असताना त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. पण मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठ घालवली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर 2 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उत्तर दिलं. कोल्हापूर इथं झालेल्या प्रचार सभेत त्यांनी मोदींना खडे बोल सुनावले. नरेंद्र मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला. मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठ घालवली आहे असा आरोपही त्यांनी केला.

आणखी काय म्हणाले शरद पवार

निवडणुकीची जबाबदारी सगळ्यांची आहे. ही निवडणूक अनेक मुद्यांमुळं महत्वाची आहे. मी अनेक मोठ्या नेत्यांची भाषण आयुष्यात ऐकली पण मोदींसारखं कुणी बोललं नाही.

पंतप्रधान ही एक ही संस्था आहे या पदावर असताना त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. पण त्याची जबाबदारी, खबरदारी आजचे पंतप्रधान घेत नाहीत.

मोदींचं वर्ध्याचं भाषण मी अगत्याने ऐकत होतो, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत गरजेची असताना त्याविषयी ते भाषणात काहीच बोलले नाहीत.

जिथं महात्मा गांधींचे वास्तव्य होत, तिथे त्यांनी वेगळाच विचार मांडला.

अजित पवार उत्तम काम करतात. ते उत्तम प्रशासक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा एकट्या दुकट्याचा पक्ष नाही जनतेचा पक्ष आहे.

मोदी कुठेही गेले की, पहिला गांधी परिवारावर हल्ला करतात. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तान ला धडा शिकवून इतिहास घडवला नाही तर त्यांनी भूगोल घडवला.

राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर सोनिया गांधी यांनी देश सोडला नाही, त्यांनी देशाची बांधिलकी जपली. मग अस असताना गांधी कुटुंबाचा अपमान करण पंतप्रधान यांना शोभत का?

First published: April 2, 2019, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading