मतदानावेळीही दिसला सेलिब्रिटींमध्ये पांढऱ्या कपड्यांचा ट्रेण्ड

बॉलिवूडकर मतदान करणार आणि त्यावेळी ग्लॅमर दिसणार नाही असं तर होऊच शकत नाही ना...

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 09:19 PM IST

मतदानावेळीही दिसला सेलिब्रिटींमध्ये पांढऱ्या कपड्यांचा ट्रेण्ड

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात पार पडलं. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिकांनी आपलं बहुमुल्य मत नोंदवलं. सलमान खानपासून दीपिका पदुकोणपर्यंत साऱ्यांनीच आपला हक्क बजावत मतदान केलं.

आता बॉलिवूडकर मतदान करणार आणि त्यावेळी ग्लॅमर दिसणार नाही असं तर होऊच शकत नाही ना... या निवडणुकीत स्टार्सनी कशी वोटिंग फॅशन सुरू केली हेच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

सर्वात आधी बोलू बॉलिवूडचा दबंग सलमान खानबद्दल. मतदानासाठी येताना सलमानने निळ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. मुंबईच्या गर्मीत सलमानचा हा कॅज्युअल लुक फार कुल होता.

Loading...

शाहरुख मुलगा अब्राम आणि पत्नी गौरी खानसोबत मतदान करायला पोहोचला होता. यावेळी शाहरुखने निळ्या रंगाचं स्टायलिश जॅकेट घातलं होतं तर अब्रामनेही बरगंडी रंगाचं जॅकेट घातलं होतं.

निळ्या रंगाचं डेनिम शर्ट आणि फ्लॉरल स्कर्टमध्ये अनुष्का फार स्टायलिश दिसत होती.

बरगंडी रंगाच्या ट्रॅक सूटमध्ये रणबीर कपूर फारच कुल दिसत होता. त्याने आपल्या आउटफिटसा काळ्या रंगाची टोपी आणि पांढऱ्या रंगाच्या बुटांनी पूर्ण केलं.

अभिनेत्री दीपिका पदुकोणनने पांढऱ्या रंगाचं सैल शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. दीपिकाच्या या लुकची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे.

एकीकडे दीपिकाचा स्टायलिश लुक दिसला तर दुसरीकडे तिचा नवरा रणवीर सिंग कॅज्युअल लुकमध्ये मतदान करायला आला. तो उन्हामुळे फार टॅन झाल्यासारखाही वाटला.

दीपिकाप्रमाणेच करिना कपूरनेही पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं. पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये तैमुरसोबत करिना मतदान करायला गेली होती.

अभिनेत्री प्रियांका चोप्राही काहीशा अशाच अंदाजात मतदान केंद्रावर पोहोचली होती. ती सध्या आपल्या सिनेमांमध्ये आणि खासगी आयुष्यात कितीही व्यग्र असली तरी तिने आवर्जुन मतदान केलं.

अमिताभ बच्चन आपल्या पत्नी जया बच्चनसोबत मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी त्यांनी पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. तर जया बच्चन यांनी पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.

अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनही मतदान करायला पांढऱ्या कपड्यांमध्ये पोहोचले. अभिषेकने काळ्या आणि पांढऱ्या रंगाला पसंती दिली होती. तर ऐश्वर्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...