देशात मतदानाचा उत्साह; मतदान केंद्राबाहेर रांगा

देशात मतदानाचा उत्साह; मतदान केंद्राबाहेर रांगा

देशात सध्या मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मतदान केंद्राबाहेर देखील लांबच लांब रांगा आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 114 जागांकरता मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील 14 जागांवरती मतदान पार पडत आहेत. बारामती, नगर, सातारा, पुणे याठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या आहेत. दरम्यान, गुजरातमधील 26 आणि केरळमधील 20 जागांवरती देखील मतदान पार पडत आहे.

तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाकरता देशातील मतदारांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. आसाम, केरळ, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, या ठिकाणी सकाळपासूनच आपला हक्क बजावण्यासाठी मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतदानाचा दिसणारा उत्साह हा तरूणांना देखील लाजवणारा असाच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील 26 जागांवर मतदान पार पडत आहे. गांधीनगरमधून अमित शहा देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपला मतदानाचा हक्का बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मतदान केंद्रबाहेर लोकांनी मोदी – मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं. शिवाय, आईडीपेक्षा व्होटर आयडीची ताकद जास्त असल्याचं म्हटलं.

VIDEO: विकासाच्या मुद्याऐवजी मोदी घराणेशाहीवर घसरले: अजित पवार

First published: April 23, 2019, 9:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading