'ही कुठली देशभक्ती? रिकामं पोट आणि मोदी म्हणतात योगा करा'

'ही कुठली देशभक्ती? रिकामं पोट आणि मोदी म्हणतात योगा करा'

नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानावरून आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 17 एप्रिल : आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असलेले काँग्रेसने पंजाबमधील मंत्री म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू ! एअर स्ट्राईकनंतर केलेल्या विधानावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता. शिवाय, कटीहार येथील प्रचार सभेत बोलताना सिद्धू यांनी केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद शमतो न शमतो तोच त्यांच्या आता नव्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. यावेळी सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य केलं. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी अहमदाबाद येथे गेलेल्या सिद्धू यांनी 'अरे, नरेंद्र मोदी ही आहे तुमची देशभक्ती. पोट रिकामी आहे आणि सर्वांना बाबा रामदेव केलं जात आहे. तर, खिसा रिकामी आहे आणि बँकेत खातं खोललं जात आहे.' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. सिद्धू यांच्या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'पाकिस्ताननं देखील केला होता एअर स्ट्राईक'; काँग्रेसच्या या मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

कटिहार येथे काय बोलले होते सिद्धू

मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी बिहारमधल्या कटिहारमधल्या प्रचारात मुस्लीम समुदायासमोर भाषण करताना लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध मतदान करा. तुम्ही अल्पसंख्य असूनही बहुसंख्य आहात. तुम्ही एकजूट दाखवली तर इथले उमेदवार तारिक अन्वर यांना कुणीही हरवू शकत नाही. तुमची संख्या इथे 64 टक्के आहे. इथले मुस्लीम लोक हे आमची पगडी आहेत. तुम्हाला काही त्रास झाला तरी मला सांगा. मी पंजाबमध्येही तुम्हाला मदत करेन, असं आश्वासन सिद्धू यांनी दिलं होतं. त्यावरून देखील वाद निर्माण झाला होता. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सिद्धू यांच्या विधानाचा आधार घेत प्रियांका गांधींना देखील सवाल केले होते.

VIDEO: विजयसिंह मोहितेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: रणजितसिंह

First published: April 17, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading