मोदी चाहत्यांनी पुन्हा घेतली फरहान अख्तरची शाळा

‘भोपाळच्या मतदारांसाठी हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्या शहराला अजून एका गॅस अपघातापासून वाचवू शकता.’

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 09:20 AM IST

मोदी चाहत्यांनी पुन्हा घेतली फरहान अख्तरची शाळा

मुंबई, 20 मे- बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने १९ मे रोजी भोपाळमधील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. पण त्याच्या या आवाहनाने तोच अडचणीत आला. सोशल मीडियावर ट्रोलर्सनी त्याची शाळा घेतली. फरहानने रविवारी ट्वीट करत म्हटलं की, ‘भोपाळच्या मतदारांसाठी हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्या शहराला अजून एका गॅस अपघातापासून वाचवू शकता.’

फरहानच्या आवाहन करण्यात काही चूक नव्हती. पण त्यानं हे आवाहन मतदान झाल्याच्या सात दिवसांनंतर केलं. त्याचं झालं असं की, भोपाळमध्ये १२ मे रोजी मतदान झालं पण फरहानने १९ मे रोजी ट्वीट करून मतदान करण्याचं आवाहन केलं.

सेलिब्रिटींनी केलेल्या एवढी मोठी चूक लोक माफ करतील असं तर होऊच शकत नाही. मग काय ट्विटरवरच फरहानची शाळा घेतली गेली. अनेकांन त्याला शिव्या दिल्या तर काहींनी तो धुंदीत असल्याचं म्हटलं. चौकीदार अनु माथुरने लिहिले की, ‘तू आता नशेतून जागा झाला आहेस का... भोपाळचं मतदान तर केव्हाच झालं.’


आता सोशल मीडियावर फरहानला चांगलंच ट्रोल केलं गेलं होतं. शेवटी फरहानने आपली बाजू मांडत म्हटलं की, ‘मला तारीख चुकीची वाटली तर मला चूक ठरवलं गेलं. ज्यांना इतिहास चुकीचा समजला त्याला मिठी मारताय...’ फरहानच्या या ट्वीटवरही नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच घेरलं. एका युझरने लिहिलं की, ‘सहा तासानंतर नशेतून बाहेर आलेत काका..’ लोटस नावाच्या एका युझरने लिहिले की, ‘आता फक्त इतिहास राहिला आहे.. तो वाचून घे...’

Loading...

रणबीर भाई नावाच्या एका ट्विटर युझरने लिहिले की, ‘गोडसेचं नाव घेतलं तर गळा धरला आणि जे जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवत आहेत त्यांना मिठी मारत आहेत.’ वेदांत नावाच्या युझरनेही एक मीम शेअर केलं. या मीमवर लिहिले होते की, ‘आता तर आम्हाला अजून खजील व्हायचं आहे.’ तर सर्टिफाइड इंजीनिअरने तर फरहानला दारू कमी पिण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कमी अपमान होईल.

VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 09:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...