काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रचारात काढली भाजप-शिवसेनेची 'लाज'

काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रचारात काढली भाजप-शिवसेनेची 'लाज'

'गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं तरी त्यांना जनतेला मतं मागताना 'लाज कशी वाटत नाही'

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 2 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय. लोकांच्या कायम लक्षात राहिल अशा घोषणा आणि म्हणींचा वापर करण्याकडे राजकीय पक्षांचा नेहमीच कल असतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आज नवी टॅगलाईन घेत भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल केला. 'लाज कशी वाटत नाही' ही आघाडीच्या प्रचाराची टॅग लाईन आहे.

घोषणा, म्हणी, गाणी याचा प्रचारात चपखलपणे वापर करत प्रचाराचा धुरळा उडवून देण्यात भाजप आणि शिवसेनेचा हातखंड आहे. यात आता काँग्रेसनेही उडी घेतलीय. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं तरी त्यांना जनतेला मतं मागताना 'लाज कशी वाटत नाही' असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय.

काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत या प्रचार मोहिमेची माहिती दिली. देशात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असं असताना मतं मागताना तुम्हाला 'लाज कशी वाटत नाही'

महागाईने सर्मसामान्य माणसाचं जगणं मुश्किल केलं असं असताना मतं मागताना तुम्हाला 'लाज कशी वाटत नाही'  15 लाखांचं आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला मतं मागताना तुम्हाला 'लाज कशी वाटत नाही'

असे प्रश्न आघाडीने भाजप आणि शिवसेनाला विचारले आहेत. या जाहीरातीवरून पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध आणखी जिंकणार आहे.

First published: April 2, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading