News18 Lokmat

प्रचारात अखिलेश यादव यांच्या सोबत दिसणारे कोण आहेत हे 'योगी'?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा प्रचार एका खास गोष्टींमुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला. ही खास गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत प्रचारात असलेले एक 'योगी'.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 06:06 PM IST

प्रचारात अखिलेश यादव यांच्या सोबत दिसणारे कोण आहेत हे 'योगी'?

लखनऊ 17 मे : लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आज  (17 मे) संपला. दोन महिने चाललेल्या या प्रचार युद्धात सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करत आपली बाजू जनतेसमोर मांडली. आरोप-प्रत्यारोप झाले जसे झाले तसेच अनेक गोष्टींनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा प्रचार एका खास गोष्टींमुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला. ही खास गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत प्रचारात असलेले एक 'योगी'. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ड्युप्लिकेट.अखिलेश यादव यांच्या सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच एक गृहस्थ जेव्हा मंचावर आले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर आपल्या भाषणात अखिलेश यादव यांनीच त्याचा खुलासा केला. मुख्यमंत्री हे खरे योगी नाहीत तर मंचावरचे योगी हेच खरे आहेत असं सांगून अखिलेश यादव हे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर टीका करत.


Loading...


अखिलेश यांचे समर्थक असलेल्या या योगींचं खरं नाव सुरेश ठाकूर असं आहे. लखनऊ इथं ते राहतात. बाबासाहेबांनी निर्माण केलेली घटना दिल्लीत जाळण्यात आली त्यामुळे आपण दुखवलो गेलो. पहिले जनतेला लुटणारे दरोडेखोर हे जंगलात राहत असतं आता ते पांढरे कपडे घालून राजकारणात आले आहेत. आजच्या राजकारणाचं स्वरुप बदललं पाहिजे असं वाटल्यानच आपण अखिलेश यादव यांच्या संपर्कात आल्याचं ते सांगतात.या योगींसोबतचे काही फोटोही अखिलेश यांनी ट्विट केले आहेत. अखिलेश यादव यांच्या विमान आणि हेलिकॉप्टरमध्येही ते कायम त्यांच्या सोबत दिसू लागल्याने त्यांचीही लोकांमध्ये क्रेझ वाढली.

अखिलेश यादव यांनी शुक्रवारी त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या आणखी एका तरुणाचा फोटो ट्विट केला आहे. मात्र त्यांच नाव सांगितलं नाही. हे योगी समाजदी पक्षाला किती फायदा मिळवून देतात हे आता 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...