Home /News /news /

'इथल्या' मतदारांना उमेदवार तर सोडाच पक्षही माहीत नाही!

'इथल्या' मतदारांना उमेदवार तर सोडाच पक्षही माहीत नाही!

लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी सगळीकडे जोरदार प्रचार आणि बॅनरबाजी सुरू आहे. त्यामुळे सगळेच मतदारसंघ आणि उमेदवार यावेळी भन्नाट चर्चेत आहेत.

    महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली, 08 एप्रिल : सध्या तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावर गेलात तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल ती म्हणजे काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका. लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी सगळीकडे जोरदार प्रचार आणि बॅनरबाजी सुरू आहे. त्यामुळे सगळेच मतदारसंघ आणि उमेदवार यावेळी भन्नाट चर्चेत आहेत. पण महाराष्ट्रातला एक असा मतदारसंघ आहे जिथे पक्ष तर सोडाच पण कोणता उमेदवार आहे हेदेखील त्यांना माहीत नाही. मग त्यात ते बॅनर आणि प्रचार तर लांबची गोष्ट आहे. सहाशे किलोमीटर अंतरात पसरलेल्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील दुर्गम भागात अजूनही लोकांना उमेदवार पक्ष माहीत नाही. झेंडे आणि पक्षाचे बॅनरही नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास कसा होणार हाच मोठा प्रश्न आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येत्या 11 एप्रिलला निवडणूक होत आहे. देशात सर्वाधिक लांब सहाशे किलोमीटर अंतर परिसरात पसरलेला आणि माओवाद्यां प्रभाव असलेल्या या मतदारसंघात दुर्गम भागातल्या अनेक गावांमध्ये अजूनही उमेदवार आणि उमेदवाराचा प्रचार न पोहोचल्याने निवडणुकीचं चित्र सध्या तरी दिसत नाही. या गावात पक्षाचे बॅनर, झेंडे तर नाहीच पण लोकसभेसाठी कोणता उमेदवार आहे. हेदेखील आदिवासी नागरिकांना माहीत नाही. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमापासून दुर असलेल्या अशा कठीण मतदारसंघांमधील एका अतिसंवेदनशील गावाचा विकास कसा होणार असा प्रश्न आहे. सध्या जाहिरात आणि प्रसिद्धी म्हटली की त्याची जबाबदारी ही सोशल मीडियावर असते. अशी चर्चा सध्या लोकसभा निवडणुकीचीही आहे. पण त्यात हे गाव जर इतक्या अंधारात असेल तर ते उजेडात आणण्याचं काम करणं महत्त्वाचं आहे. VIDEO : राजकारणात येणार का? संजूबाबा म्हणतो...
    First published:

    Tags: Election 2019, Gadchiroli, Gadchiroli Chimur S13p12, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या