नदीवर आंघोळीला जाताना मिळाली लोकसभेची उमेदवारी!

नदीवर आंघोळीला जाताना मिळाली लोकसभेची उमेदवारी!

नदीवर आंघोळीला जाताना उमेदवारी मिळाल्याचं तुम्ही केव्हा ऐकलं आहे? पण, असाच प्रकार घडला होता 1952च्या लोकसभा निवडणुिकीमध्ये.

  • Share this:

मुंबई, अमोल मोरे, 01 एप्रिल : निवडणुका आल्या की तिकिटांसाठी होणारं पक्षांतर ही गोष्ट आता नवीन राहिली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की लोकसभेच्या, प्रत्येक ठिकाणी या गोष्टी घडतात. अनेक जण तिकीट नाकारल्यामुळे थेट विचारधारांना तिलांजली देत सत्तेच्या मागे धावतात. शिवाय, सत्ता स्थापनेसाठी घोडेबाजार आलाच. पैशांचं वाटप ही बाब तर आता रोजच्या जीवनाचा एक भाग झाली आहे. अनेक वेळा निष्ठावंतांच्या पदरात निराशादेखील पडल्याचं आपण पाहिलं आहे. पण, एक काळ असा होता की निवडणुकीकरता उमेदवार मिळत नव्हते. हो, ही गोष्ट सत्य आहे.

कशी मिळाली नदीवर आंघोळीला जाताना उमेदवारी?

1952मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा काळ. आदिवासी भागात उमेदवार मिळणं म्हणजे कठीण काम. आजच्या काळात अनेक आदिवासी नेते, कार्यकर्ते पुढे येत असले तरी तो काळ वेगळा होता. मध्य प्रदेशातील बस्तर या ठिकाणची ही गोष्ट आहे. 1952च्या लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेस बस्तर या लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराच्या शोधात होती. खूप शोध घेतला पण उमेदवार काही सापडेना. आता काय कारायचं? हा यक्षप्रश्न काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला पडला. यावेळी राजगुरू विद्यानाथ ठाकूर उमेदवाराच्या शोधात होते.

एके दिवसी आदिवासींचा एक गट नदीवर आंघोळीला जात होता. राजगुरू यांची नजर त्या घोळक्यातील एका तरुणावर पडली. त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला त्या तरुणाला घेऊन येण्यास सांगितलं. मुचाकी कोसा असं या तरुणाचं नाव होतं. का बोलावलं गेलं या विचारात मुचाकी पूर्ण घाबरला होता. त्याला का बोलावलं आहे याची पूर्ण कल्पना देण्यात आली. नागपूरला जाण्यास सांगितल्यानंतर मात्र मुचाकी घाबरला. काय बोलावं हे त्याला कळेना.

आदिवासी झाला खासदार

त्यानंतर त्याला राजा प्रवीरभंज देव यांच्यासमोर उभं करण्यात आलं. राजानं दिलेल्या आदेशावरून मुचाकी कोसा नागपूरकडे रवाना झाले आणि त्यांनी बस्तरमधून लोकसभेकरता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष बाब म्हणजे मुचाकी कोसा निवडणुकीमध्ये विजयी झाले आणि खासदार म्हणून संसदेमध्ये दाखल देखील झाले.

पण, ज्यावेळी प्रतिज्ञापत्रावर सही करण्याची वेळ आली तेव्हा काय करावं हे मुचाकी कोसा यांना कळेना. कारण, त्यांना हिंदी किंवा इंग्रजी भाषेचं ज्ञान नव्हतं. अखेर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सही केली. कारण केवळ अंगठा लावणं ही एकच गोष्टी कोसा यांना माहीत होती.

बस्तरमधील पत्रकार डॉ. के. के. झा यांनी हा किस्सा सांगितला आहे. दीपक तिवारी यांच्या राजनीतिनामा मध्य प्रदेश ( 1956 ते 2003 ) या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे.

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

First published: April 1, 2019, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading