काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपच्या उमेदवाराचे 'स्टार प्रचारक'?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपच्या उमेदवाराचे 'स्टार प्रचारक'?

वरकरणी ही लढाई भाजप आणि राष्ट्रवादीत दिसत असली तरी खरी लढाई विखे विरुद्ध पवार अशीच आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा भाजपमध्ये गेल्याने सगळ्या देशात अहमदनगरची चर्चा झाली. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र काँग्रेसमध्येच आहे. ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असले तरी मनाने आपल्या मुलासोबत भाजपमध्ये गेल्याचं दिसून येतेय.

अहमदनगरच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हे कुणाला काही कळण्याआधी राजकारणानं दिशा बदलेली असते. काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले विरोक्षीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये आपल्या मुलाचे स्टार प्रचारक बनलेत.

नगरमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखेना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढणार आहेत. अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधींचं तिकीट कापलं गेल्यानं ते नाराज होते. त्यांच्या

विखे विरुद्ध पवार

मुलानं बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांना मध्यस्थी करावी लागली. वरकरणी ही लढाई भाजप आणि राष्ट्रवादीत दिसत असली तरी खरी लढाई विखे विरुद्ध पवार अशीच आहे. या लढाईत पवारांना विखेंच्या पराभवाची पुनरावृत्ती करायचीय तर विखेंना इतिहासातल्या पराभवाचा वचपा काढायचा आहे.

विखेंनी घेतली गांधींची भेट

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची नुकतीच भेट घेतली होती. ही भेट कशासाठी आणि दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मिळाला नाही. मात्र नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे, भाजपचे नगरचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्य दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

खासदार दिलीप गांधींशी आपण चर्चा केली असून त्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचे सुजय विखेंनी नुकतेच म्हटले होते. त्यामुळे राधाकृष्ण विखेंची ही भेटही नाराजी दूर करण्यासाठीच तर नव्हती ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या काँग्रेसमध्येच असले तरी आपण आघाडीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नाही, असे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला नगरची जागा न सोडल्याने सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला होता.

First published: March 29, 2019, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading