जयपूर, 02 एप्रिल : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपला धुळ चारत विजय मिळवला. 2014च्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसला राहुल गांधी यांच्या नेतृत्वात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेला मोठा विजय होता. त्यानंतर आता काहीही करून लोकसभेचं मैदान मारायचं असा निर्धार काँग्रेसनं केला आहे. त्यासाठी आता मंत्र्यांसाठी पक्ष नेतृत्वानं थेट फर्मान काढलं आहे. यामध्ये तुम्हाला पद टिकवायचं असेल तर तुमच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झालाच पाहिजे, नाहीतर मंत्रीपद गमवावं लागेल असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर आमदारांना देखील लोकसभेत विजय प्राप्त करा आणि विधानसभेत मंत्रीपद मिळवा अशी सरळ ऑफर देण्यात आली आहे.
काँग्रेसचे राजस्थानमधील सहप्रभारी विवेक बन्सल यांनी मंत्र्यांना दिलेल्या टार्गेटची माहिती दिली. त्यामुळे लोकसभेत मिळणाऱ्या यशावर आता काँग्रेसच्या मंत्र्यांचं पद टिकणार किंवा आमदारांना पद मिळणार आहे.
लोकसभा 2019 : 'हम निभाएंगे' म्हणत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
मंत्री उतरले मैदानात
दरम्यान, पक्ष नेतृत्वानं काढलेलल्या या आदेशानंतर आता मंत्री देखील मैदानात उतरले आहेत. त्यामुळे काहीही करून विजय मिळवायचा हा निर्धार आता राजस्थानमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनी केला आहे.
10 जिल्ह्यांमधील प्रभारीचं टेन्शन वाढलं
काँग्रेस नेतृत्वानं दिलेल्या या आदेशामुळे आता विधानसभा निवडणुकीत 10 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित अशी कामगिरी न झालेल्या जिल्हा प्रभारींसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण मंत्रीपद टिकवायचं असेल तर विजय हवा. या टेन्शन वाढवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पाली, जालोर, सिरोही, भीलवाडा, झालावाड, कोटा, बांसवाडा, डूंगरपूर, चित्तौडगढ आणि राजसमंद यांचा समावेश आहे. या 10 जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपच्या मागे होती.
VIDEO: असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा; राहुल गांधींचं UNCUT भाषण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.