कोलकात्यात अमित शहांच्या गाडीवर हल्ला, भाजप आणि तृणमूलमध्ये तुफान राडा

कोलकात्यात अमित शहांच्या गाडीवर हल्ला, भाजप आणि तृणमूलमध्ये तुफान राडा

तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज आणलं असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय.

  • Share this:

कोलकाता 14 मे : पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्यात रोड शोमध्ये सहभागी झालेल्या अमित शहांच्या वाहनावर हल्ला झाल्याने तुफान राडा झाला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, दगडफेक झाली. अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला.

भाजपने अमित शहा यांच्या रोड शोची कोलकत्यात घोषणा केल्यापासूनच तृणमूल आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. सात किलोमीटरच्या या रोड शोला सुरूवातीला परवानगी दिली गेली नाही. शेवट्या क्षणी परवानगी मिळाली होती. रोड शो सुरू झाल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले त्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वातावरण चिघळलं. त्यातच अमित शहा आणि भाजपचे नेते ज्या गाडीवर उभे होते त्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण आणखीच तापलं. तृणमूल छात्र परिषदेचे कार्यकर्ते यात आघाडीवर होते. या कार्यकर्त्यांनी रस्त्यात असलेले बॅरेकेट्स अमित शहांच्या गाडीपुढे आणल्याने भांडण वाढलं.

त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी अमित शहा यांना आणि इतर नेत्यांना पोलिसांनी सुरक्षीत पुढे नेलं. तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज आणलं असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावं असं आवाहनही त्यांनी केलं.

ममता बॅनर्जी यांचं राज्य जाणार असून लोकांची जुलमी राजवटीपासून सुटका होणार आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. कोलकाता पोलीस हे ममता बॅनर्जी यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading