News18 Lokmat

भाजपच्या जाहीरनाम्यात काय असणार? सर्वाचं लक्ष

भाजप आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 10:03 AM IST

भाजपच्या जाहीरनाम्यात काय असणार? सर्वाचं लक्ष

नवी दिल्ली, 07 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आता सत्ताधारी भाजप देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. 2014मध्ये भाजपनं काळा पैसा, भ्रष्टाचार आणि रोजगाराच्या मुद्यावर भर दिला होता. त्यामुळे यंदाच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या मुद्यांना प्राधान्य दिलं जाणार हे पाहावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर देखील भाजप भर देताना दिसत आहे. 2014मध्ये भाजपनं राम मंदिराचा मुद्दा देखील उचलून धरला होता. त्यामुळं जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्याचा समावेश असणार का? हे पाहावं लागणार आहे. भाजपनं जाहीरनामा समिती देखील स्थापन केली होती. त्यामुळे भाजपच्या आजच्या जाहीरनाम्याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

2 एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील अकबर रोड येथील काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा सादर केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सादर करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात नमूद असलेल्या गोष्टींबाबत बोलतांना ''सत्तेत आल्यानंतर काँग्रेस शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेट संसदेत सादर करणार'' असं राहुल गांधी म्हणाले. तसंच ''गरिबांना किमान उत्पन्न देण्याची हमी देण्यात आली आहे. गरिबांच्या खात्यात किमान उत्पन्न 72 हजार रुपये जमा करणार,'' असं आश्वासन राहुल यांनी यावेळी दिलं. तसंच''कर्ज न चुकविणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, नवीन रोजगार सुरू करणाऱ्यांना किमान तीन वर्षापर्यंत रोजगार सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, 6 लाख तरुणांना ग्राम पंचायतमध्ये रोजगार देणार,'' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.


Loading...

काश्मिरी युवक आणि जवानांमध्ये तणाव, थेट घटनास्थळावरील VIDEO आला समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 10:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...