नथुराम गोडसेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ; अमित शहांनी घेतली दखल

नथुराम गोडसेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ; अमित शहांनी घेतली दखल

भाजपच्या अनुशासन समितीनं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, अनंतकुमार हेगडे आणि अनिल सौमित्र यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये 10 दिवसांमध्ये उत्तर द्या असे आदेश देण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे : 'महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता' भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपची कोंडी झाली. त्यानंतर 'साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे,' असं भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं. त्यामुळे भाजप समोरच्या अडचणी आणखी वाढल्या. प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जाहीर माफी मागण्यास सांगितल्यानंतर आता पक्षाच्या अनुशासन समितीनं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, अनंतकुमार हेगडे आणि अनिल सौमित्र यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये 10 दिवसांमध्ये उत्तर द्या असे आदेश देण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी देखील वाचाळवीरांच्या या विधानाची दखल घेतली आहे.

काय म्हणाले होते अनिल सौमित्र

'महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे,' असं मध्य प्रदेशातील भाजप प्रवक्ता अनिल सौमित्र याने म्हटलं होतं. 'गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक,' अशी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट या भाजप प्रवक्त्याने लिहिली आहे. त्यानंतर त्याला देखील पक्षाच्या अनुशासन समितीनं नोटीस पाठवली आहे.

काय म्हणाले अमित शहा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षानं त्यांची विधानं गांभीर्यानं घेतली असून त्यांच्याकडे उत्तर मागितली असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञासिंह?

'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं' भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या होत्या. अभिनेते कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसे दहशतवादी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याआधी साध्वा प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.

VIDEO: धक्कादायक! पुण्यात कोयता, लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड

First published: May 17, 2019, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading