आझम खानला निवडणूक लढवूच देऊ नका, रेणुका शहाणेचा संताप

महिलांचा आदर न करता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खान यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाली आहे. पण त्यांच्यावर कारवाई होईल का हाच मुळात प्रश्न आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 04:50 PM IST

आझम खानला निवडणूक लढवूच देऊ नका, रेणुका शहाणेचा संताप

मुंबई, १६ एप्रिल- सध्या सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आपलाच पक्ष किती चांगला आणि या पक्षातले कार्यकर्ते किती चांगले हे सिद्ध करण्यासाठी राजकीय नेते कोणत्याही थराला जात आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे आझम खान. लोकसभा निवडणूकीसाठी समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांनी भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आझम खानच गोत्यात आले.

सोशल मीडियासह सर्व बाजूंनी त्यांच्यावर टीका होत आहे. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही संताप व्यक्त करत अखिलेश यादव यांच्याकडे एक मागणी केली आहे. रेणुका यांनी ट्विटरवर अखिलेश यादव यांना टॅग करत म्हटलं की, ‘महिलांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या वक्तीयला निवडणुकीचे तिकीटच दिले जाऊ नये.’यंदा जया प्रदा भाजपकडून रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. प्रचारादरम्यान आझम यांनी जया प्रदा यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केला. एवढंच नाही तर अत्यंत खालच्या पातळीची भाषा त्यांनी वापरली. नेमकी हीच गोष्ट त्यांना भोवली. आझम खान यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली.

Loading...

रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘महिलांचा आदर न करता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खान यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाली आहे. पण फक्त एफआयआर दाखल करून चालणार नाही. प्रत्यक्ष कारवाई होणं महत्त्वाचं आहे. पण त्यांच्यावर कारवाई होईल का हाच मुळात प्रश्न आहे. त्यांना अखिलेश यादव यांनी २०१९ ची निवडणूक लढवायला देता कामा नये.’

SPECIAL REPORT : पुण्यातील उमेदवाराचा हटके प्रचार; ना वाहनांचा ताफा, ना कार्यकर्त्यांची फौज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...