'तर आठवड्यातील प्रत्येक दिवसासाठी एक पंतप्रधान असेल आणि रविवारी देश सुट्टीवर जाईल'

'तर आठवड्यातील प्रत्येक दिवसासाठी एक पंतप्रधान असेल आणि रविवारी देश सुट्टीवर जाईल'

अमित शहा यांनी काढला विरोधकांचा चिमटा

  • Share this:

कानपूर, 30 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा 2014 प्रमाणे यश मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. कानपूर येथे झालेल्या सभेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाआघाडीवर घणाघाती टीका केली.

हे देखील वाचा: ...तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात हिंसाचार होईल- अमेरिका

अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या बसपा-सपा युती ही भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारीचे युती असल्याचे सांगितले. भाजप आणि PM मोदी यांची लोकप्रियता रोखण्यासाठी महाआघाडी तयार केली जात आहे. 2014च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात कानपूरमधून झाली होती. कानपूर ही वीरांची भूमी आहे आणि 2019च्या निवडणुकीसाठी बुथ अध्यक्षांची पहिली बैठक देखील येथेच होत असल्याचे शहा म्हणाले. मोदी सरकार न्यू इंडियाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत असताना काही जण त्याला विरोध करत आहेत. पण आज जो बदल तुम्हाला दिसत आहे तो तुम्ही केलेल्या मतदानामुळे झाला आहे. त्यामुळेच देशात बहुमताचे सरकार आल्याचे शहांनी सांगितले.

वाचा: मोदी सरकारने रोजगार अहवाल रोखला; NSCच्या दोघा सदस्यांनी दिला राजीनामा

दिल्लीत जर महाआघाडीचे सरकार सत्तत आले तर सोमवारी मायावती पंतप्रधान असतील, मंगळवारी अखिलेश यादव, बुधवारी ममता बॅनर्जी, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी एच.डी.देवेगौडा आणि शनिवारी स्टालिन PM असतील. तर रविवारी देशच सुट्टीवर असेल, अशा शब्दात शहा यांनी विरोधकांचा चिमटा काढला.

राम मंदिरावर केले वक्तव्य

अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी भाजप कटिबद्ध आहे. श्रीराम जन्मभूमीच्या त्याच जागेवर त्याच ठिकाणी मंदिर होणार असल्याचे ते म्हणाले.

VIDEO : मूर्तीला हार घालताना गेला तोल; 15 फुट उंचीवरून पडल्याने पुजाऱ्याचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 04:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading