पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा सुजय विखेंचा 'Winning Factor'

पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा सुजय विखेंचा 'Winning Factor'

राहुरी मतदार संघातून डॉ. सुजय विखे यांना पहिल्यांदा भाजपात येण्याची ऑफर दिली. हा मतदारसंघ शिवाजीराव कर्डीले यांचा मतदारसंघ आहे.

  • Share this:

अहमदनगर, 24 मे : बहुचर्चित नगरची लोकसभेची जागा अखेर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तबल 2 लाख 81 हजार 474 मतांनी जिंकली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभेच्या जागांमध्ये डॉ. सुजय विखे यांनी लीड घेतली आहे. नगर शहराचे संग्राम जगताप हे आमदार असूनही 53122 मतांनी लीड मिळवली आहे.

विधानसभा निहाय मतदान,

कर्जत जामखेड मतदार संघ हा पालकमंत्री राम शिंदे यांचा मतदार संघ आहे. त्याठिकाणी रोहित पवार यांनीही लक्ष घातलं होतं. पण तरीदेखील तिथे भाजपने लीड मिळवली आहे.

कर्जत जामखेड मतदार

डॉ. सुजय विखे - 105336

संग्राम जगताप - 80563

मताधिक्य        - 24673

श्रीगोंदा मतदारसंघ

हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे लीड देण्याची जबाबदारी ही आमदार राहुल जगताप यांच्यावर होती. मात्र तिथेही 30592 एवढं मताधिक्य मिळालं.

हेही वाचा : राहुल गांधी घेणार का पराभवाची जबाबदारी? राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

श्रीगोंदा मतदार

डॉ. सुजय विखे - 109103

संग्राम जगताप - 78511

मताधिक्य     - 30592

नगर विधानसभा मतदारसंघ

नगर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचं होमपिच आहे. पण तिथे राष्ट्रवादीच्या पदरात निराशा पडली. भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 53122 एवढं मताधिक्य मिळालं आहे.

नगर मतदार

डॉ. सुजय विखे, 108860

संग्राम जगताप - 55738

मताधिक्य -     53122

पारनेर मतदारसंघ

पारनेर मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी हे तिथे आमदार आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले निलेश लंके यांच्यावर राष्ट्रवादीची भिस्त होती आणि पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे अनेक गट आहेत. पण त्यांना जिंकूण आणण्यास शरद पवार यांना अपयश आल्याचं दिसतं.

पारनेर मतदार

डॉ. सुजय विखे, -11708

संग्राम जगताप -80372

मताधिक्य - 36709

राहुरी मतदारसंघ

राहुरी मतदार संघातून डॉ. सुजय विखे यांना पहिल्यांदा भाजपात येण्याची ऑफर दिली.  हा मतदारसंघ शिवाजीराव कर्डीले यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे प्राबल्य आहे. तर अर्ध्या भागात आमदार शिवाजीराव कर्डीले यांची सत्ता आहे. या ठिकाणी शिवाजीराव कर्डीले यांनी काही प्रमाणावर जावयाचं काम केल्याची चर्चा आहे. कर्डिले हे काल विजयी मेळाव्यालाही उपस्थिती नव्हते. तरीही विखेंनी आपली ताकद पणाला लावून आणि राजकीय समीकरणांची जुळव-जुळवा करण्याराधाकृष्ण विखे पाटलांना यश आलं आहे.

राहुरी मतदार

डॉ सुजय विखे- 126713

संग्राम जगताप - 54910

मताधिक्य --    71803

शेवगाव पाथर्डी मतदारसंघ

या मतदार संघात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचा आहे. या मतदारसंघावर मुंडे परिवाराचं प्राबल्य आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनीही हे सिद्ध केलं आहे. राजीव राजळे यांच्या निधनानंतर मोनिका राजळे यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे त्यांनीही प्रामाणिकपणे विखे यांचं काम केलं आहे. याच मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांना ऐहिक मते मिळाली आहेत.

पाथर्डी शेवगाव मतदार

डॉ सुजय विखे, 129968

संग्राम जगताप - 69270

मताधिक्य - 60698

'आ देखे जरा किसमे कितना है दम', भाजप आमदाराच्या डान्सचा VIDEO व्हायरल

First published: May 24, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading