‘या’ ज्येष्ठ अभिनेत्यानेही धरला भाजपचा हात, मोदींसाठी म्हणाले...

‘या’ ज्येष्ठ अभिनेत्यानेही धरला भाजपचा हात, मोदींसाठी म्हणाले...

‘मोदी ही एक अशी व्यक्ती आहे जी प्रेरणादायी आहे. ते फक्त पाच तास झोपतात. त्यांना देशासाठी काम करायचं आहे आणि देशाला त्यांचा जास्तीत जास्त वेळ मिळायला हवा.’

  • Share this:

मुंबई, 11 मे- सध्या सगळीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक पक्ष आपल्याकडे नावाजलेला कलाकार ओढण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या कॉमिक टायमिंगने आणि नानाविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवलेले अभिनेते अरुण बक्शी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

एकीकडे सनी देओल, गौतम गंभीरसारखे सेलिब्रिटींनी भाजपकडे वळले असताना आता अरुण यांनीही याच पक्षाला प्राधान्य दिलं. दिल्लीत छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांच्या उपस्थितीत अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

लग्नाआधीच गरोदर राहिली अक्षय कुमारची 'हिरोईन'

अरुण यांनी 'कयामत', 'हिना' आणि 'हिंद की बेटी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'देख भाई देख' यांसारख्या नावाजलेल्या मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. यावेळी अरुण यांनी पंतप्रधान मोदींबद्दलचे त्यांचे विचारही मांडले. अरुण म्हणाले की, ‘मोदी ही एक अशी व्यक्ती आहे जी प्रेरणादायी आहे. ते फक्त पाच तास झोपतात. त्यांना देशासाठी काम करायचं आहे आणि देशाला त्यांचा जास्तीत जास्त वेळ मिळायला हवा.’

क्रिती, सारानंतर आता या अभिनेत्रीला डेट करतोय सुशांत सिंग राजपूत?

अरुण यांनी आपल्या सिनेप्रवासात १०० हून जास्त सिनेमांत काम केलं. फार कमी लोकांना माहीत आहे की ते उत्तम गातात. त्यांनी २९८ गाणी गायली आहेत. अरुण यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर अनेक पंजाबी आणि भोजपूरी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अरुण यांचा जन्म पंजाबमध्ये झाला.

लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांतच ‘जिस्म 2’ चा अभिनेता घेतोय घटस्फोट

आर्या कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी पंजाब एग्रीकल्चरल यूनिव्हर्सिटीमध्ये काम केलं. १९८१ मध्ये त्यांनी टीव्हीमधून आपल्या सिनेकरिअरला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मालिकांमध्ये काम केलं आणि नंतर सिनेमांत आपलं नशीब आजमावलं. अरुण बक्शी यांना बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतून खरी ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी ‘गुरु’, ‘कुछ तो गडबड है’ आणि ‘मासूम’ सिनेमांत काम केलं.

मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2019 05:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading