लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात PM मोदींसह या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 59 जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीतून काँग्रेसचे अजय राय यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल नेता अभिषेक बनर्जी डायमंड हार्बरमधून निवडणूक लढवत आहेत.
दक्षिण कोलकातामधून भाजपकडून सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस हे निवडणूक लढवत आहेत.
हिमाचल प्रदेशमधील हमीरपूरमधून भाजपचे उमेदवार अनुराग ठाकूर मैदानात आहेत.
बॉलीवूड अभिनेता सनी देओल गुरदासपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सनी देओल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्यात काट्याची लढत आहे.
अकाली नेता हरसिमरत कौर या पंजाबच्या बठिंडा येथून नशीब आजमावत आहे.
लालू प्रसाद यादव यांची थोरली कन्या आणि राजद नेत्या मीसा भारती या बिहारमधील पाटलीपुत्र मतदार संघातून मैदानात उतरल्या आहेत.
पाटणा साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा आणि भाजप नेते, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आमने-सामने आहे.
प्रमुख उमेदवारांमध्ये पाटणा साहिबहून काँग्रेसच्या तिकीटावर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा मैदानात आहेत.
बॉलीवूड अॅक्ट्रेस किरण खेर चंडीगड लोकसभा मतदार संघात भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात आहे.
अकाली नेता सुखबीर बादल हे पंजाबमधील फिरोजपूरमधून निवडणूक लढवत आहेत.
झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन दुमका येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
First published:
May 19, 2019, 12:54 PM IST