नागरिकतेवर प्रश्न विचारणाऱ्यांना दीपिका पदुकोणने दिलं सडेतोड उत्तर

नागरिकतेवर प्रश्न विचारणाऱ्यांना दीपिका पदुकोणने दिलं सडेतोड उत्तर

दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 मध्ये कोपनहेगेन, डेनमार्क येथे झाला होता. जन्माच्या वर्षभरानंतर दीपिकाचं संपूर्ण कुटुंब बंगळुरू येथे स्थायिक झालं.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल- बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नागरिकतेवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. ती भारतीय नागरिक नसल्याचं अनेकदा म्हटलं गेलं. यावर दीपिकाने कधीच स्पष्टीकरण दिलं नाही. पण आज मुंबईतील वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावत तिने अनेकांची तोंडं बंद केली. आज महाराष्ट्रात 17 लोकसभेच्या जागांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या वेळेत दीपिकाकडे भारतीय नागरिकत्त्व नसल्यामुळे ती मतदान करू शकत नाही, असं म्हटलं जात होतं.

बॉलिवूडच्या 'या' स्टार कपलच्या मतदानापेक्षा त्यांच्या फॅशनचीच झाली चर्चा

या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देताना दीपिकाने सोशल मीडियावर आपला मतदानानंतर बोटाला शाई लावलेला एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘ज्यांना मी भारतीय नागरिक आहे की नाही या संभ्रमात होते, त्यांना मी सांगू इच्छिते की आता तुम्ही या संभ्रमातून बाहेर या... जय हिंद.’

फक्त अर्जुन रामपालची गर्लफ्रेंडच नाही तर या अभिनेत्रीही लग्नाआधी राहिल्यात गरोदर

दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 मध्ये कोपनहेगेन, डेनमार्क येथे झाला होता. जन्माच्या वर्षभरानंतर दीपिकाचं संपूर्ण कुटुंब बंगळुरू येथे स्थायिक झालं. यानंतर तिचं पूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण बंगळुरू येथेच झालं. दीपिका सध्या बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. तिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून केली होती.

फक्त बॉलिवूड स्टारच नाही तर या मराठी सेलिब्रिटींनीही केलं मतदान

First published: April 29, 2019, 8:37 PM IST

ताज्या बातम्या