‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर १० हातांनीही मतदान करेन’, VIRAL VIDEO

‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर १० हातांनीही मतदान करेन’, VIRAL VIDEO

मोदींना पाठिंबा दाखवण्यासाठी त्या असं काही बोलल्या की अनुपम यांनी त्यांचं हे बोलणंच रेकॉर्ड करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 21 मे- सध्या देशभरात फक्त निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारेच यंदा कोणाचं सरकार येणार... कोणता उमेदवार जिंकला पाहिजे.. यावरच चर्चा होताना दिसते. काही कलाकार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन करत आहेत. यातलेच एक म्हणजे अभिनेते अनुपम खेर. अनुपम यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत तर स्वतः अनुपमही मोदी समर्थक आहेत. आता यात अनुपम यांची आई दुलारी खेरही मोदींच्या समर्थनात उतरल्या. दुलारी यांनीही मोकळेपणाने मोदींचं समर्थन केलं आहे. मोदींना पाठिंबा दाखवण्यासाठी त्या असं काही बोलल्या की अनुपम यांनी त्यांचं हे बोलणंच रेकॉर्ड करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडिओमध्ये अनुपम यांची आई दुलारी खेर या नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. यासोबतच त्यांना ‘चौकीदार चोर’ हे वाक्य फारसं आवडलं नसल्याचंही त्या म्हणाल्या. व्हिडिओत दुलारी म्हणतात की, ‘मला मोदी फार आवडतात. ते फार चांगले आहेत. त्यांना गरीब लोक आशीर्वाद देतात. यंदा मोदीच जिंकणार. माझे जर १० हात असते तर मी १० हातांनी त्यांना मत दिलं असतं.’

लग्नानंतर एकटीच हनिमूनला गेली होती 'या' अभिनेत्याची पत्नी

दुलारी एवढंच बोलून थांबल्या नाहीत तर त्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की, ‘तुम्ही मोदींना चोर का म्हटलं? काय चोरी केली त्यांनी?’ दुलारी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एग्झिट पोलच्या आधीच माझ्या आईने तिचा निर्णय सांगितला. मी मतदान संपण्याची वाट पाहत होतो, त्यामुळे हा व्हिडिओ उशीराच शेअर केला. यात तुम्हाला स्पष्ट कळेल की तिला मोदींना वोट का द्यायचे होते. तिचं शेवटचं वाक्य फारच मजेशीर आहे.’

नवरा असावा असा! आधी प्रियांकासाठी पकडली छत्री आता भरवला पिझ्झा

बॉलिवूडमध्ये फार कमी कलाकार राजकारणावर बोलणं आणि आपलं मत मांडणं पसंत करतात. यात अनुपम खेर यांचं नाव आवर्जुन घेतलं पाहिजे. कोणाचीही भिती न बाळगता ते आपलं मत स्पष्ट मांडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या सिनेमांत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

फक्त 'सांभा'च नाही तर या 5 खलनायकांच्या मुलीही दिसतात सुंदर, अभिनेत्रींना देतील मात

SPECIAL REPORT: एक्झिट पोलनंतर सोशल मीडियावर मीम्सला उधाण

First published: May 21, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या