महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या नियमांत मोठी शिथिलता; सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि योगा क्लासबद्दल घोषणा

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या नियमांत मोठी शिथिलता; सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि योगा क्लासबद्दल घोषणा

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येत आहे. 5 नोव्हेंबरपासून सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. तसंच नाट्यगृहे देखील आता खुली होणार आहेत.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्तच्या ठिकाणी हे सर्व सुरू होईल. सिनेमा हॉल सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. सामाजिक अंतर आणि शासनाकडून सांगण्यात आलेल्या इतर उपाययोजना करणं बंधनकारक असणार आहे.

दुसरी लाट येण्याची शक्यता, अनलॉकनंतरही घ्यावी लागेल काळजी

एकीकडे, राज्यात मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत विविध गोष्टी सुरू करण्यास पुन्हा परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत खबरदारी आगामी काळातही घ्यावी लागणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 4, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या