भिवंडी, 21 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक फटका सर्वांनाच बसत असून पैशांची चणचण भासत असल्याने भिवंडीत पैसे लुटण्यासाठी आणि उसनवारी पैशातून दोन हत्याच्या घटना समोर आल्या आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाउनमध्ये पैश्यावरून दोन हत्येच्या धक्कादायक घटनामुळे खळबळ माजली आहे.
1 एप्रिल रोजी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोगाव पाईपलाईन शेजारी एका तरुणाची हत्या झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचे प्रेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान संचारबंदीच्या काळात घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हत्येच्या आरोपींचा शोध घेत गुन्ह्याची उकल केली आहे.
हेही वाचा - पालघर मॉब लिंचिंगः साधुंच्या हत्येवर RSS नाराज, ट्विटरवर दिली पहिली प्रतिक्रिया
सोहेल लालाखान पठाण ( वय 18 वर्ष , रा. रहमतपुरा शांतीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यास नशा करण्याची सवय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोहेल याने त्याचा मित्र शाहबाज मोहमद शाकीर अंसारी ( रा. शांतीनगर, आझादनगर) याच्याकडून दीड महिन्यांपूर्वी 20 हजार रुपये उसने घेतले होते. या पैशांवरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच पोलोसांनी शाहबाज अंसारी यास त्याब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली असता मयत सोहेल याने उसने घेतलेले पैसे देण्यास नकार देऊन शाहबाज यास शिवीगाळ केली होती.
या गोष्टीचा राग धरून शाहबाज याने सोहेल यास भेटायला बोलावले. त्यानंतर रस्त्याने पायी जात असताना पोगाव येथील पाईपलाईन जवळ सोहेल याच्या पोटावर, डोक्यावर आणि गळ्यावर धारदार सूऱ्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून त्यास ठार मारल्याची शाहबाज याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी तथा तालुका पोलीस ठाण्याचे प्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे.
हेही वाचा - बॉलिवूड स्टार्सची स्टाइल 10 वर्षांपूर्वी होती अशी, PHOTOS पाहून पोट धरुन हसाल
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड , अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार राठोड, उपविभागीय पोलोस अधीक्षक दिलीप गोडबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार प्रकाश साईल , संतोष सुर्वे , प्रवीण हाबळे , महादेव खोमणे , सुनील कदम , पोलीस नाईक हनुमान गायकर , अमोल कदम , उमेश ठाकरे, सतीश कोळी , सुहास सोनावणे ,पोलीस कॉन्स्टेबल रवी राव यांनी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा -पाण्यामार्फतही पसरू शकतो coronavirus; काय सांगतात तज्ज्ञ?
पैसे लुटण्यासाठी यंत्रमाग कामगाराची हत्या
भिवंडी शहरालगतच्या कारीवली येथील तलावाच्यापुढे एका यंत्रमाग कारखान्यात मेहता म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा अज्ञात मारेकऱ्याने पाठीमागून धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. अजित स्वयंकांत पटेल (४७ रा.बालाजी नगर ,कारीवली ) असे भोसकून हत्या झालेल्या यंत्रमाग कामगाराचे नाव आहे.
हा कामगार भंडारी कंपाऊंड येथे कारखान्यात काम करीत होता. तो कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी कारीवली तलावमार्गे रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी तो तलावाच्या पुढे असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसल्याने ते थेट हृदयात वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या हत्येचा गुन्हा भोईवाडा पोलीस ठाण्यात झाला असता गुन्हे क्राईम ब्रांच विभागातील पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे असिफ अन्सारी आणि अफजल मन्सुरी यांना अटक केली असता त्यांनी पैसे लुटण्यासाठी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.