नांदेडमधल्या गुरुद्वारात अडकले देशभरातले 4 हजार भाविक

नांदेडमधल्या गुरुद्वारात अडकले देशभरातले 4 हजार भाविक

नांदेडच्या सचखंड गूरुद्वारात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यात पंजाब आणि हरियानाच्या भाविकांचा सर्वात जास्त समावेश असतो.

  • Share this:

नांदेड 13 एप्रिल : लॉकडाऊमुळे सगळा देश ठप्प झाला आहे. हजारो लोक ठिक ठिकानी अडकून पडले आहेत. शिख धर्मियांच्या दृष्टिने अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी आलेले तब्बल 4 हजार भाविक अडकले आहेत. पंजाब आणि हरीयाना राज्यातील हे  भावीक गेल्या  महिन्याभरापासुन नांदेडमध्ये अडकले आहेत. हे सर्वजण शेतकरी आहेत. सध्या पंजाबमध्ये गहू कापणीचा हंगाम सुरू आहे. हे शेतकरी  जर  वेळेवर आपल्या गावी पोहचले नाही तर  त्यांचं मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे.

नांदेडच्या सचखंड गूरुद्वारात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. लॉकडाऊन पूर्वी देखील पंजाब, हरियाना आणि इतर राज्यातील भाविक नांदेडला आले होते. काही जण त्याच काळात परतले. पण लॉकडाऊन झाल्याने जवळपास  चार हजार भाविक नांदेडमध्ये अडकले आहेत.

कोरोनाचा उद्रेक : 24 तासांमध्ये 51 मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या

या भाविकांना परत पाठवण्याची व्यवस्था करावी अशी मागाणी गुरुद्वारा बोर्डाने राज्य सरकार,  पंजाब सरकार आणि स्थानीक प्रशासनाकडे केली, पण त्या भाविकांना परत पाठवण्याची कुठलीच व्यवस्था अजून तरी झाली नाही.

या भाविकांमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. यातले अनेक जण आजारी देखेल आहेत त्यांची सर्व व्यवस्था गुरुद्वाराकडून केली जात आहे. पण हे शेतकरी वेळेत गावी पोहचले नाही तर त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

कोरोनाशी लढणाऱ्या भारताचं महिलेनं केलं कौतुक, अमेरिकेत दाखल केला गुन्हा

या भावीकांना पंजाबला आणण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्याची मागणी केंद्रीय मंत्री हरसिमरन कौर बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

First published: April 13, 2020, 8:32 PM IST
Tags: nanded

ताज्या बातम्या