S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

खंडाळ्यानजीक मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प

खंडाळा रेल्वेस्टेशन जवळ मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरलेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झालीय. रेल्वे प्रशासनाकडून डबे बाजूला हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Chandrakant Funde | Updated On: Sep 7, 2017 05:28 PM IST

खंडाळ्यानजीक मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प

लोणावळा, 7 सप्टेंबर : लोणावळ्याजवळील खंडाळा रेल्वे स्टेशन जवळ एक मालगाडी ट्रॅक वरून खाली उतरली. मालगाडीचे ७ वॅगन ट्रॅक वरून उतरल्या असून सुमारे १०० ते १५० मीटर लांबीच्या रेल्वे रुळाला याचा फटका बसला असून रूळ उखडले आहे, तर एक विजेचा खांब ही ट्रॅक वर पडला आहे. ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मध्य रेल्वेची मुंबई कडून पुण्याकडे जाणारी मिडल आणि डाऊन लाईन वरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या लाईन केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज बांधणे सध्यातरी कठीण आहे.

खंडाळा रेल्वेस्टेशन जवळ मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरलेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झालीय. रेल्वे प्रशासनाकडून डबे बाजूला हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close