शहरी भागातील भारनियमन काही प्रमाणात रद्द

शहरी भागातील भारनियमन काही प्रमाणात रद्द

वाढत्या भारनियमनावरून लोकांमध्ये संतापाचा उद्रेक होताच राज्य सरकारने शहरी भागांमधलं काही भारनियमन तुर्तात मागे घेतलंय.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर : वाढत्या भारनियमनावरून लोकांमध्ये संतापाचा उद्रेक होताच राज्य सरकारने शहरी भागांमधलं काही भारनियमन तुर्तात मागे घेतलंय. भांडूप,मुलुंड आणि ठाणे येथील भारनियमन मागे घेण्यात आलंय. पुणे, नागपूर विभागातील भारनियमन देखील मागे घेण्यात आलंय. पण ज्या ठिकाणी वीजगळती जास्त आहे त्या ठिकाणी मात्र, भारनियमन कायम राहणार आहे.

वीज प्रकल्पांना मिळणारा कोळसा अचानक पुरवठा कमी झाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर भारनियमन करावं लागतंय. त्याविरोधात सोशल मीडियातून मोठा उद्रेक उसळला होता. विरोधी राजकीय पक्षांनी राज्यभर आंदोलनं सुरू केली होती. त्यानंतर अखेर सरकारला जाग आलीय. आणि किमान शहरी भागातलं भारनियमन तात्पुरतं रद्द करण्यात आलंय. याउलट ग्रामीण भागातलं भारनियमन मात्र, तसंच ठेवण्यात आलंय.

First published: October 6, 2017, 4:34 PM IST

ताज्या बातम्या