तलवारीने केला तरुणाच्या मानेवर वार, नालासोपाऱ्यातला हल्ल्याचा LIVE VIDEO

तलवारीने केला तरुणाच्या मानेवर वार, नालासोपाऱ्यातला हल्ल्याचा LIVE VIDEO

मारामारी सोडवायला एक तरुण गेला होता. त्यानंतर तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी एकत्र येऊन तरुणावरच तलवारीने वार केले.

  • Share this:

नालासोपारा, 02 जुलै : नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर हाय टेन्शन रोडवर  चित्रपटात शोभेल अशी तलवारबाजीची भीषण घटना घडली आहे. एका टोळक्याने तलवारी आणि धारधार शस्त्रांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला.

हा व्हिडिओ 27 जूनचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. 15 ते 20 गुंडांनी या वस्तीत दहशत माजवली आहे. या गुंडांनी तलवारी आणि धारधार शस्त्रांनी एका तरुणावर भीषण हल्ला केल्याचं दिसत आहे. क्षुल्लक कारणावर हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर  ही मारामारी सोडवायला एक तरुण गेला होता. त्यानंतर तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी एकत्र येऊन तरुणावरच तलवारीने वार केले.

या व्हिडिओत वस्तीतील बरेच लोकं हे या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. पण, तरीही हे गुंड कुणाचं ऐकण्याच्या तयारीत नव्हते. व्हिडिओमध्ये एक तरुण तलवार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सुशांतच्या आत्महत्येवेळी घरात होता त्याचा मित्र, पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी

त्यानंतर एका गुंडाने तरुणाच्या मानेवरच तलवारीने वार केला. पाठीमागून त्याच्या साथीदाराने या तरुणाला पकडले होते. त्यानंतर त्याने वार केला. तलवारीचा भीषण वार झाल्यामुळे तरुण जागेवर कोसळला. त्यानंतर पळून जातानाही या गुंडांनी जमिनीवर पडलेल्या तरुणावर लाथा मारून पळ काढला.

याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने हा आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 9:31 AM IST
Tags: nalasopara

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading