राज्यात दिवसभरात 47,288 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 155 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 26,252 कोरोनामुक्त
राज्यात सध्या 4 लाख 51,375 ॲक्टिव्ह रुग्ण
20:54 (IST)
अनिल देशमुखांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
20:45 (IST)
कोरोनाग्रस्तांना बेड, व्हेंटिलेटरची कमतरता, रुग्ण हवालदिल; राज्य सरकारनं तात्काळ वाढीव बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याचं नियोजन करावं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राज्य सरकारकडे मागणी
20:39 (IST)
25 वर्षांपुढील सर्वांना लस द्या - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती
'युवावर्गाला कोरोना संसर्गापासून रोखणं आवश्यक'
दीड कोटी डोस मिळावेत - उद्धव ठाकरे
'6 जिल्ह्यांसाठी 3 आठवड्यांत लसीकरणाची तयारी'
20:16 (IST)
शिक जिल्ह्यात दिवसभरात 4619 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4313 रुग्ण बरे
नाशिक जिल्ह्यात 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू
20:12 (IST)
नाशिक - गंगापूर धरणाच्या सावरगाव बॅक वॉटरच्या जलाशयात बुडून दोघा अल्पवयीन मित्रांचा मृत्यू, स्थानिक जलतरणपटूंनी शोधले मृतदेह
19:54 (IST)
राज्यात रात्री 8 पासून संचारबंदी लागू
राज्यात 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध राहणार
शनिवार, रविवार राज्यात पूर्ण लॉकडाऊन
शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी स.7 लॉकडाऊन
कोरोना थोपविण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार
राज्यातील अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार
19:49 (IST)
मुंबई महापालिका कार्यालयातील प्रवेश निषिद्ध
अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही
फक्त लोकप्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल
टपालही मुख्य गेटवर स्वीकारलं जाईल
19:43 (IST)
मुंबईतील सर्व पालिकेच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांचं फायर ऑडिट केलं जाणार, सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय, मुख्य अग्निशमन अधिकारी 15 दिवसांत अहवाल सादर करणार
19:21 (IST)
मुंबई दिवसभरात 9857 नवीन रुग्णांची नोंद
मुंबई दिवसभरात 21 कोरोना रुग्णांचा मृत्यू
मुंबईत आज 748 इमारती केल्या सील
कोरोना त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि देशभरतील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट