• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Live Updates : सागर बंगल्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दीड तासापासून खलबतं, मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार?

Live Updates : सागर बंगल्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दीड तासापासून खलबतं, मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार?

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

 • News18 Lokmat
 • | August 05, 2022, 22:36 IST
  LAST UPDATED 12 DAYS AGO

  हाइलाइट्स

  22:58 (IST)

  सुशील खोडवेकर पुन्हा प्रशासकीय सेवेत रुजू
  बहुचर्चित टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी
  सुशील खोडवेकर हे 2011 IAS बॅचचे अधिकारी
  टीईटी घोटाळ्यात पुणे पोलिसांकडून झालेली अटक
  अटकेनंतर सुशील खोडवेकर झाले होते निलंबित
  उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळावर
  खोडवेकरांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती

  22:35 (IST)

  - सागर बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात दीड तासांपासून बैठक सुरू 

  - उशिरापर्यंत ही बैठक सुरू राहणार, अजून २-३ तास बैठक होणार

  22:33 (IST)

  मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची 'सागर'वर बैठक
  शिंदे-फडणवीस बैठक रात्री उशिरापर्यंत चालणार
  मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता

  22:30 (IST)

  कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक 'सुवर्ण'
  बजरंग पुनियाला 65 किलो वजनी गटात 'सुवर्ण'

  22:28 (IST)

  ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील घटना
  डॅम शेजारी खेळताना 5 वर्षांची 3 मुलं बेपत्ता
  नितेश कडाळी, जयेश वाघ, रवी आघाणे बेपत्ता
  तीनही बेपत्ता मुलांचा मुरबाड पोलिसांकडून शोध

  22:6 (IST)

  तिरुपती देवस्थान बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी 'मातोश्री'वर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही होते उपस्थित

  21:47 (IST)

  ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला यश आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आगामी ग्रामपंचायतींसाठी बांधणी सुरू, शिंदे गटाच्या 50 आमदारांच्या मतदारसंघांतील निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती, थेट सरपंच निवडणूक याचा मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल, ग्रामपंचायती अधिक निवडून आणत आपल्या गटातील आमदारांचं मताधिक्य टिकवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न

  20:37 (IST)

  काँग्रेस द्वेषाचं राजकारण करतंय - अमित शाह
  केंद्रीय गृहमंत्र्यांची काँग्रेसच्या आंदोलनावर टीका

  20:17 (IST)

  एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'सागर' बंगल्यावर

  19:52 (IST)

  परळच्या वाडिया रुग्णालयातील आग प्रकरण
  मुख्यमंत्र्यांचा मनपा आयुक्तांशी फोनवरून संपर्क
  वाडिया रुग्णालय आग दुर्घटनेची माहिती घेतली
  शिंदेंनी लहान मुलांच्या सुरक्षेची केली चौकशी

  Live Updates:  मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिले. पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.