Live Update : रश्मी ठाकरेंकडून टेंभी नाका येथील देवीची आरती, शिवसैनिकांची तुफान गर्दी, पाहा VIDEO

रश्मी ठाकरे ठाण्यात पोहोचल्या आहेत. इथे आधी त्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत.

 • News18 Lokmat
 • | September 29, 2022, 17:09 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:12 (IST)

  राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
  ठाणे महापालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर
  विद्यमान आयुक्त विपीन शर्मांची बदली
  विपीन शर्मांची एमआयडीसी सीईओपदी बदली
  पल्लवी दराडे यांची पर्यावरण विभागात बदली
  सौरव विजय यांची पर्यटन खात्यात बदली
  इक्बालसिंह चहल यांची मात्र बदली नाही

  21:35 (IST)

  नरेंद्र मोदींच्या हस्ते 36व्या राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन
  उद्घाटन सोहळ्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

  21:23 (IST)

  मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना 22 हजार 500 रुपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  19:35 (IST)

  राज्य संवर्गातील 5 अधिकाऱ्यांना IAS नॉमिनेशन, केंद्र सरकारचं नोटिफिकेशन जारी; बी.एच. पालवे, एस.एम. कुर्तकोटी, एस.सी. पाटील, डी.के. खिलारी आणि आर.एस. चव्हाण या अधिकाऱ्यांना IAS कॅडर

  19:31 (IST)

  चर्नी रोड स्टेशनजवळच्या परिसरातील 32 अनधिकृत झोपड्या हटवल्या

  19:28 (IST)

  स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

  19:20 (IST)

  रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

  19:17 (IST)

  मिळकत दोन्ही हातानं मिळवा - मोहन भागवत
  जी मिळवता येत असेल ती मिळवा - मोहन भागवत
  'पण स्वत:जवळ जितकी गरज आहे तेवढीच ठेवा'
  'पाश्चिमात्य देशात पैसे कमावणाऱ्यांची पुस्तकं'
  'आपल्याकडे दान देणाऱ्यावर पुस्तकं निघतात'
  'जगात नि:स्वार्थ भावनेनं मदत करणारा भारत'
  'लंकेत व्यवस्थित होतं तेव्हा तिथं अनेक देश गेले'
  चीन पण गेला होता श्रीलंकेत - मोहन भागवत
  'पण आता श्रीलंका अडचणीत, भारताची मदत'
  कारण आपल्याकडे भक्ती आहे - मोहन भागवत
  भारताचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे - भागवत

  19:0 (IST)

  पुण्यात परतीच्या पावसाचा तडाखा
  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
  पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं
  घराबाहेर असलेल्या पुणेकरांची तारांबळ

  18:55 (IST)

  पुण्यात अचानक पावसाची दमदार हजेरी
  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
  घराबाहेर असलेल्या पुणेकरांची तारांबळ
  अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं

  Live Update : रश्मी ठाकरे ठाण्यात पोहोचल्या आहेत. इथे आधी त्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर आनंद मठात जाणार असून नंतर टेंभी नाका देवीचे दर्शन घेणार आहेत