Live Update: पुण्यात रिक्षा बंद आंदोलनाला हिंसक वळण, रिक्षा अडवून काचा फोडल्या

पुण्यात रिक्षा बंद आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालं. रिक्षा बंद आंदोलनात सहभागी न झालेल्या रिक्षा अडवून काचा फोडण्यात आल्या.

 • News18 Lokmat
 • | November 28, 2022, 14:21 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:45 (IST)

  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या 'सुप्रीम' सुनावणी
  16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार
  उद्या सुनावणीचं वेळापत्रक ठरण्याची शक्यता
  मागील सुनावणीत लेखी बाजू मांडण्याचे दिलेले निर्देश

  20:43 (IST)

  'राऊतांना पूर्ण संरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी'
  यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारशी बोलू - केसरकर
  'आवश्यक ते स्टेटमेंट करण्याचा त्यांना अधिकार'
  ज्येष्ठ नेत्यावर कारवाई होणं चुकीचं ठरेल - केसरकर
  'वैचारिक मतभेद जरूर, महाराष्ट्र म्हणून एक आहोत'
  'सीमाप्रश्न सामोपचारानं सोडवावा अशी सीएमची इच्छा'
  'तीच भूमिका कर्नाटक शासनही स्वीकारेल असं वाटतं'
  सुरक्षा काढण्याचा, समन्सचा काडीमात्र संबंध नाही - केसरकर
  'राज्यांचे संबंध बिघडतील अशी कारवाई करण्यात येऊ नये'

  20:41 (IST)

  पुण्यातील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे
  प्रशासकीय समिती स्थापन करण्याचं आश्वासन
  बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाईची मागणी
  कारवाई न झाल्यास 12 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन

  20:29 (IST)

  पुणे - चांदणी चौकापुढे एका बसला आग
  भुगावकडे जाणाऱ्या रोडवर बस पेटली
  अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी

  20:11 (IST)

  उदयनराजेंच्या पाठीशी आम्ही कायम - देवेंद्र फडणवीस
  'छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत'
  राजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या - फडणवीस
  राज्यपालांबद्दल निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात - फडणवीस
  'संवैधानिक पद असल्यानं हस्तक्षेप करू शकत नाही'

  19:22 (IST)


  41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा संपन्न, भागीदार राज्याचा महाराष्ट्र दालनाला पुरस्कार

  19:21 (IST)

  महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार राष्ट्रीय 'शिल्प' पुरस्कारानं सन्मानित

  19:7 (IST)

  दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण
  आरोपी आफताबच्या गाडीवर हल्ला
  हातात तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न
  पोलिसांना हवेत करावा लागला गोळीबार


  पनवेल - मानसरोवर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग
  अनेक गाड्या खाक, आगीचं कारण मात्र अस्पष्ट
  अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात

  18:13 (IST)

  पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी बंदसाठी रिक्षासेवा बंद
  आरटीओ कार्यालयाबाहेर हजारो रिक्षाचालकांचा ठिय्या
  एका बाईक टॅक्सी चालकाला आंदोलनकर्त्यांची मारहाण

  18:3 (IST)

  राहुल गांधींचं वीर सावरकरांवरील वक्तव्य प्रकरण
  रणजित सावरकरांचा पोलिसांनी नोंदवला जबाब
  शिवाजी पार्क पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

  Live Update: पुण्यात रिक्षा बंद आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालं. रिक्षा बंद आंदोलनात सहभागी न झालेल्या रिक्षा अडवून काचा फोडण्यात आल्या. पुण्यातील सिंहगड रस्तावर बंदमध्ये सहभागी न होणाऱ्या रिक्षा फोडल्या गेल्या आहेत.