Live Update: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दोन वाहनांना धडक देत टँकर चालक फरार

नवले पुलाजवळ नुकताच आणखी एक अपघात झाला असून यात दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.

 • News18 Lokmat
 • | November 26, 2022, 13:48 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  18:17 (IST)

  बुलढाणा-चिखलीत उद्धव ठाकरेंचा मेळावा
  उद्धव ठाकरेंची तोफ सत्ताधाऱ्यांवर धडाडली
  संविधान आज सुरक्षित आहे का? - उद्धव ठाकरे
  'पुढची वाटचाल लोकशाही वाचवण्याच्या दिशेनं'
  'गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचे आशीर्वाद हवेत'
  हुकूमशाही हवी की लोकशाही हवी? - उद्धव ठाकरे
  'स्वत:चं भविष्य माहीत नाही, ते तुमचं काय ठरवणार?'
  त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत - ठाकरे
  तुम्ही धगधगत्या पेटत्या मशाली आहात - ठाकरे
  पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच - उद्धव ठाकरे
  'इथल्या ताईंना चार-पाच वेळा खासदार केलं'
  'ताईंनी मोदींना राखी बांधली अन् ईडीवाले गप्प'
  भाजप हा आता आयात पक्ष - उद्धव ठाकरे
  'गद्दारांना आशीर्वादासाठी गुवाहाटीला जावं लागतं'
  गद्दारांना बाळासाहेबांचं नाव,आशीर्वाद मोदींचा हवा
  मर्दानगी असेल तर स्वतंत्र लढून दाखवा - ठाकरे
  'आता पंढरपूरचा विठुराया कर्नाटकात जाणार का?'
  सरकार महाराष्ट्राला तोडण्याचं काम करतंय - ठाकरे
  'निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले'
  'उद्योग बाहेर जात असतानाही शेपट्या घालून बसलात'
  'शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही'
  'बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होता'
  महिलांना शिवीगाळ कसे करू शकता? - ठाकरे
  ठाकरेंकडून सत्तार यांचा अब्दुल गटार असा उल्लेख
  राज्यपालांच्या काळ्या टोपीखाली काय दडलंय? - ठाकरे
  'शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री गुवाहाटीला'
  अतिवृष्टीग्रस्तांना मदत कधी देणार? - उद्धव ठाकरे
  शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून दाखवा - ठाकरे
  जनाची नाही तर मनाची लाज बाळगा - उद्धव ठाकरे
  शेतकऱ्यांचं पोट कसं भरणार ते सांगा? - ठाकरे
  जनता आता भोळीभाबडी राहिलेली नाही - ठाकरे
  शिवसेना म्हणजे मेलेलं गाढव नाही - उद्धव ठाकरे
  'खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पनवती'
  'रेटून नेतायत, खोटं बोलून सरकार चालवतायत'
  मी मुख्यमंत्री असतो तर ही वेळ आली नसती - ठाकरे
  शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका - उद्धव ठाकरे
  शिवसेना कितीही फोडली तरी संपणार नाही - ठाकरे
  आता मुख्यमंत्री गुवाहाटीत रमलेत - उद्धव ठाकरे
  'हेलिकॉप्टरनं शेतात उतरणारा मुख्यमंत्री दाखवा'
  उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला
  सरकारकडून आशा-अपेक्षा राहिलेली नाही - ठाकरे
  'शेतकरी टाहो फोडत असताना तिकडे का नाही जात?'
  उस्मानाबादचं नाव धाराशिव करून दाखवलं - ठाकरे
  शेतकऱ्यांनी आपला हात कुणाला दाखवायचा? - ठाकरे
  'हिंदुत्वावरून लोकांची कधीच फसवणूक केली नाही'
  आम्ही हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार केला - ठाकरे
  'बोक्यांना खोक्याची भूक लागली म्हणून गद्दारी'
  निष्ठा हीच शिवसेनेची ओळख - उद्धव ठाकरे
  'तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही'
  गद्दारांना आता माफी नाही - उद्धव ठाकरे
  चिन्ह गोठवलं पण मशाली पेटवल्या - उद्धव ठाकरे
  सळसळतं रक्त हीच शिवसैनिकांची ओळख - ठाकरे
  'शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर उतरा'
  उद्धव ठाकरेंचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश

  16:42 (IST)

  राज ठाकरे मंगळवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर 
  अंबाबाई देवीच्या दर्शनानं होणार दौऱ्याची सुरुवात
  कोल्हापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार
  सिंधुदुर्ग,रत्नागिरीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा
  आंगणेवाडीच्या भराडीदेवीचंही राज ठाकरे घेणार दर्शन
  राजापूर विधानसभा मतदार संघातल्या 200 महिला करणार मनसेत प्रवेश 

  16:41 (IST)

  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा गुवाहाटी दौरा
  मुख्यमंत्री शिंदेंसह आमदार-खासदार गुवाहाटीत
  एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन
  आमदार, खासदारांसह कामाख्या देवीच्या चरणी
  शेतकरी, कष्टकऱ्यांना समृद्धी लाभो - मुख्यमंत्री
  आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार - एकनाथ शिंदे  

  15:32 (IST)

  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा गुवाहाटी दौरा
  मुख्यमंत्री शिंदेंसह आमदार-खासदार गुवाहाटीत
  आमदार, कुटुंबासह घेतलं कामाख्या देवीचं दर्शन

  15:32 (IST)

  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन
  वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
  विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
  मराठी, हिंदी चित्रपटांमधल्या भूमिका गाजल्या
  अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शनातही ठसा
  नाटकं, टीव्ही मालिकांमधील भूमिका गाजल्या
  विक्रम गोखलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा
  पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात
  वैकुंठ स्मशानभूमीत संध्याकाळी 6 वा. अंत्यसंस्कार 

  13:47 (IST)

  नवले पुलाजवळ आणखी एक अपघात 
  टँकरच्या धडकेत दोन वाहनांचे नुकसान
  सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
  टँकर चालक टँकरसह फरार 

  13:11 (IST)

  शिंदेंसह आमदार, खासदार गुवाहाटी विमानतळावर

  10:50 (IST)

  पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे दौरा रद्द - सत्तार
  'कृषी प्रदर्शनामुळे गुवाहाटीला जाता आलं नाही'
  नाराज नसल्याचं अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण

  9:6 (IST)

  मुंबईवरील 26/11चा दहशतवादी हल्ला प्रकरण
  मुंबई पोलीस आयुक्तालयात शहिदांना अभिवादन
  राज्यपाल कोश्यारींकडून शहिदांना अभिवादन
  शिंदे, फडणवीसांकडून शहिदांना अभिवादन

  7:6 (IST)

  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा गुवाहाटी दौरा
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात गुवाहाटीला
  सकाळी 9 वा. निघणार, 12 वाजता दाखल होणार
  आमदार कुटुंबासह कामाख्या देवीचं दर्शन घेणार

  Live Update: नवले पुलाजवळ नुकताच आणखी एक अपघात झाला असून यात दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेत एका टँकरने वाहनांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर टँकर चालक टँकरसह फरार झाला आहे