Live Update: 'गृहविभाग कायदा-सुव्यवस्था पाळणार', देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

शिवसेना दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क होणार की नाही हा प्रश्न आता न्यायालयात पोहोचला आहे.

 • News18 Lokmat
 • | September 23, 2022, 23:45 IST
  LAST UPDATED 12 DAYS AGO

  हाइलाइट्स

  23:3 (IST)

  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील टी-20 मॅच
  भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
  ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून केला पराभव
  टी-20 मालिकेत भारताची 1-1 अशी बरोबरी

  21:52 (IST)

  राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेष उपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन

  21:47 (IST)

  रिलायन्स रिटेलच्या जिओमार्टनं आगामी सणासुदीच्या हंगामासाठी 'त्योहार रेडी सेल' आणि 'बेस्टिवल सेल'ची घोषणा, ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; बँक ऑफर, फ्लॅश डील आणि रिलायन्स ब्रँडवर विशेष सूटही देणार, आजपासून 23 ऑक्टोबरपर्यंत या सेलचा ग्राहकांना फायदा घेता येणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, लॅपटॉप, स्मार्टवॉच, मोबाईलवरही विशेष सूट

  20:55 (IST)
  युतीच्या आशेवर न राहता स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीला लागा, अजित पवारांनी जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला 'एकला चलो'चा नारा
   
  19:47 (IST)

  मुंबईतील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी
  टॅक्सीचं 3, रिक्षाचं भाडं 2 रुपयांनी वाढणार
  1 ऑक्टोबरपासून नवीन भाडेवाढ लागू होणार

  19:10 (IST)

  कोर्टाचा निर्णय, आमच्या त्यांना शुभेच्छा - फडणवीस
  'कोर्टानं सांगितल्याप्रमाणे प्रशासन नियम पाळेल'
  गृहविभाग कायदा-सुव्यवस्था पाळणार - फडणवीस
  'टार्गेट आम्ही अमित शाह असताना घोषित केलंय'
  एक पारदर्शी सरकार आम्ही देऊ - देवेंद्र फडणवीस
  मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार संपवायचाय - फडणवीस

  18:41 (IST)
  शिवसेनेला न्याय मिळालाय त्यासाठी मनापासून समाधान व्यक्त करतो, निरपेक्ष पद्धतीनं न्याय मिळालाय, ज्यांना एकनाथरावांचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी बीकेसीला जावे, ज्यांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी शिवाजी पार्कला जावं - अजित पवार
   
  18:30 (IST)

  मुंबई भाजपची योजना बैठक होती - अतुल भातखळकर
  'दोन दिवसांच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली'
  राजकीय परिस्थितीबाबत विश्लेषण - भातखळकर
  'मुंबई महापालिकेसाठी वातावरण पूर्णत: अनुकूल'
  भाजप आणि मित्रपक्ष 150 जागा जिंकेल - भातखळकर

  17:50 (IST)

  'उत्साह अमाप पण एकजूटही तशी ठेवायची आहे'
  प्रत्येक महापालिका जिंकायचीच - उद्धव ठाकरे
  शिवसेनेचा भगवा फडकवायचाच - उद्धव ठाकरे
  'निवडणुका आल्यावर रुसवा-फुगवा, गटतट नको'
  आपली उमेदवारी म्हणजे भगवा झेंडा - उद्धव ठाकरे
  निवडणुकीच्या तयारीला लागा, ठाकरेंचे आदेश

  17:49 (IST)

  'उत्साह अमाप पण एकजूटही तशी ठेवायची आहे'
  प्रत्येक महापालिका जिंकायचीच - उद्धव ठाकरे
  शिवसेनेचा भगवा फडकवायचाच - उद्धव ठाकरे
  'निवडणुका आल्यावर रुसवा-फुगवा, गटतट नको'
  आपली उमेदवारी म्हणजे भगवा झेंडा - उद्धव ठाकरे
  निवडणुकीच्या तयारीला लागा, ठाकरेंचे आदेश

  शिवसेना दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क होणार की नाही हा प्रश्न आता न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयातच या प्रश्नावर तोडगा निघणार आहे. सध्या या प्रश्नावर सुनावणी सुरू असून कोर्ट याबाबत काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागलेलं आहे