Live Update: मुंबईत आज अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या भेटी; या मार्गांवरील वाहतूक संथ

मुंबईत आज अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या पूर्वनियोजित भेटीमुळे सांताक्रूझ, वरळी सी लिंक, रिगल सर्कल या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे

 • News18 Lokmat
 • | December 02, 2022, 12:43 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:10 (IST)

  जत तालुक्यातील 42 गावांच्या पाण्याबाबत रविवारी पाणी संघर्ष कृती समितीची निर्णायक बैठक

  21:20 (IST)

  गोव्यात परदेशी महिलेवर बलात्कार
  गोवा पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

  20:53 (IST)

  समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी
  पंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला होणार लोकार्पण
  शिंदे-फडणवीस 4 तारखेला महामार्गाची पाहणी करणार

  20:1 (IST)

  उदयनराजे आमचे नेते आहेत, ज्या राज्यपालांनी पायी जाऊन दर्शन घेतलं त्यांच्याकडून काही बोलले असतील तर माझी हात जोडून विनंती आहे की हा विषय संपवावा - चंद्रकांत पाटील

  19:56 (IST)

  शिवप्रेमींकडून उदयनराजे भोसलेंचं जंगी स्वागत
  महाडच्या शिवाजी चौकात शिवप्रतिमेला अभिवादन
  रायगडावर उद्या 'निर्धार शिवसन्माना'चा कार्यक्रम
  उदयनराजे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष

  19:36 (IST)

  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सुसज्ज

  19:32 (IST)

  सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  19:12 (IST)

  विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, जत तालुक्यातील 42 गावांच्या पाणी योजनांसाठी निधी उपलब्धतेची ग्वाही; आरोग्य, शिक्षण, वीज, पायाभूत सुविधांबाबतही सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

  19:10 (IST)

  केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर
  अहिरांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
  'मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न'
  मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून करणार - अहिर

  18:14 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणीसाठी चैत्यभूमीवर
  महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा

  Live Update:  मुंबईत आज अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या पूर्वनियोजित भेटीमुळे सांताक्रूझ, वरळी सी लिंक, रिगल सर्कल या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.  सकाळी 11 ते 12.30 आणि 2.30 ते 5 पर्यंत वाहतूक संथ राहील. यानुसार प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.